Agricultural assistant distributing crop insurance leaflets in Pimpalgaon Lep, Rajapur area. esakal
नाशिक

Nashik Crop Loan: 25 हजार शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच! कृषी विभागाचे शर्थीचे प्रयत्न

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांचा अधिकचा प्रतिसाद मिळत आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crop Loan : शेतकरी हितासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना लागू केली असून, यंदा निसर्गही बेभरवशाचा झाल्याने तालुक्यातील तब्बल २५ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विम्याचे कवच घेतले आहे.

अजूनही सुमारे ४५ हजार शेतकरी बाकी असून, त्यांच्याकडून विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर विमा उतरून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेश जंगम यांनी केले आहे. (25 thousand farmers took crop insurance cover Conditional efforts of Department of Agriculture nashik)

शासनाने सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक रुपयांत पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांचा समावेश केला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीला संरक्षण दिले आहे. मागील वर्षी पीकविमा योजनेंतर्गत विमा हप्ता रकमेच्या २ ते ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत असल्यामुळे जिल्ह्यातील केवळ २३ टक्के शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांचा अधिकचा प्रतिसाद मिळत आहे. किंबहुना प्रत्येक गावात १०० टक्के विमा उतरला जावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गावोगावी बांधावर जनजागृती

शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, यासाठी तालुक्यात कृषी विभाग सरसवला आहे. अधिकारी, मंडलाधिकारी, कृषी सहाय्यक गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून विमा उतरविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.

यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने विमा उतरवला गेल्याचे आकडे सांगतात. तालुक्यातील आतापर्यंत २४ हजार ७८७ शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. यात ६०५ कर्जदार, तर २४ हजार १८६ वैयक्तिक शेतकरी आहेत.

तब्बल १४ हजार हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विम्याकडे अधिक ओढा असून, तब्बल २१ हजार ४७९ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी, तर दोन हजार बहुधारक शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे, तर १९ हजार ८७५ पुरुष व चार हजार ९०८ महिला शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

पोर्टल स्लो

पोर्टलवर विमा नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असून, चार दिवस उरल्याने आता शेतकऱ्यांची विमा उतरविण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून पोर्टलही स्लो चालत असून, सर्वर डाऊनची अडचण येत आहे. त्यामुळे विमा नोंदण्यासाठी मुदतवाढ देण्याचे अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

"नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा कवच उपयोगी पडते. शिवाय शेतकरी हिस्साही शासन भरणार असल्याने अवघ्या एक रुपयात प्रमुख पिकांचा विमा काढला जातोय. तालुक्यात अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन जनजागृती केली आहे. तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला असून, उर्वरित शेतकऱ्यांनीही मुदतीत पिकाचा विमा उतरून आपल्या पिकाला विमा संरक्षण मिळवावे."

-महेश जंगम, तालुका कृषी अधिकारी, येवला

आकडे बोलतात...

-एकूण खातेदार शेतकरी : ६९६८२

-विमा काढलेले : २४७८७

-विमा घेण्याचे राहिलेले : ४४८९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT