नाशिक : महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी पर्यावरण रक्षणातंर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयावर पंचवीस हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी गंगाघाटावरील पाडवा पटांगणावर साकारण्यात आली आहे.
महारांगोळी बघण्याचा आनंद नाशिककरांना उद्यापर्यंत घेता येणार आहे. (25 thousand square feet Maha Rangoli at goda ghat attracted attention nashik news)
पर्यावरणाचा समतोल हा पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. आपले शरीर, पृथ्वी तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे, अशी आपली धारणा आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल बिघडला की पर्यावरणाचाही समतोल बिघडतो.
पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे. रांगोळीमध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वीदेखील साकारण्यात आली आहे. मानवी शरीर, पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतानी बनलेले आहे हे दाखवण्यासाठी रांगोळीमध्ये अंतर्भाव केला आहे.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये विचार केलेल्या पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नी), वायू व आकाश या पाच तत्त्वांना पंचमहाभूते म्हणतात ते साकारत पर्यावरण समतोलासाठी उपयुक्त बाबींचा ऊहापोह करणारी मानव कल्याणकारी अशा या महारांगोळीचे प्रयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
महारांगोळी बघण्यासाठी सहकुटुंब पाडवा पटांगणावर यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश दरगोडे, योगेश गर्गे व जयंत गायधनी यांनी केले आहे. आयोजनासाठी प्रसाद गर्भे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महंकाळे, रोहित गायधनी, दीपक भगत आदी प्रयत्नशील आहेत.
वापरण्यात आलेले साहित्य-
तब्बल २५००० स्क्वेअर फूट अशा या महारांगोळीसाठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत ही महारांगोळी साकारली आहे.
कार्यक्रमात आज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणजेच ‘मृत्युंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविद्या व त्याचबरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ (सायंकाळी ६ वा.) सादर केली जाणार आहे. यावेळी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.