Accident Black Spot esakal
नाशिक

Nashik Accidental Black Spot: शहरातील 26 ब्लॅक स्पॉट रडारवर; ऑक्टोबरमध्ये 106 ठिकाणी धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accidental Black Spot : महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरातील २६ धोकादायक ठिकाणांची अर्थात ब्लॅक स्पॉटची यादी अतिक्रमण विभागाला प्राप्त झाली आहे.

तसेच शहरातील छोट्या- मोठ्या चौकांमध्ये साधारणतः १०६ ठिकाणी विविध प्रकारचे अतिक्रमण असून त्यावर ऑक्टोबरमध्ये हातोडा चालवण्यात येणार आहे. (26 black spots in city on radar Strike action at 106 places in October nashik)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची चौकात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात खासगी बसचा अपघात होऊन बसला आग लागण्याची दुर्घटना घडली होती. या घटनेत १३ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले होते.

घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत नाशिकसह राज्यातील अपघातप्रवण, धोकादायक ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते.

तसेच अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मनपा बांधकाम विभाग, नगररचना विभाग, शहर वाहतूक पोलिस, आरटीओ यांनी संयुक्त पाहणी करत २६ ब्लॅक स्पॉट शोधून काढले होते.

यानंतर नगररचना विभागाने संबंधित चौकांमधील अनधिकृत पक्की बांधकामे, तसेच अतिक्रमणांचे रेखांकन करून ही यादी अतिक्रमणाकडे सादर करणे अपेक्षीत होते.

यानंतर महापालिका नगररचना विभागाकडून ब्लॅक स्पॉटची यादी मिळत नसल्याचे अतिक्रमण विभागाने ११ सप्टेंबरला नगररचना विभागाला स्मरणपत्र पाठविले होते.

अतिक्रमण आणि नगररचना असे दोन्ही विभाग मनपाच्या मुख्यालयात एकाच ठिकाणी आहे. असे असताना एकाच इमारतीतून फाइल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यास विलंब लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नगररचना विभागाकडून यादी प्राप्त झाल्यानंतर आता संबंधित विभागीय कार्यालयांकडे ही यादी सादर करून पाहणी करण्यात येणार आहे.

कोणत्या ठिकाणी कसले अतिक्रमण आहे तसेच पक्के बांधकामे किती व कोणत्या प्रकारचे आहे याबाबतची सविस्तर माहिती तयार करून त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त नितीन नेर यांनी सांगितले.

नाशिक रोडला सर्वाधिक अतिक्रमण

नगररचना विभागाने दिलेल्या यादीत मनपाच्या सहा विभागांतील १०६ धोकादायक चौकाचा समावेश आहे. यात अनेक ठिकाणी बेकायदा पक्के बांधकामे आहेत. तर काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत.

या १०६ ठिकाणांमध्ये नाशिक पूर्व विभागात १४, पश्चिम विभागात १७, पंचवटी विभागात २१, नाशिकरोड विभागातील २३, नवीन नाशिक विभागातील २१ तर सातपूर विभागातील १० ठिकाणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT