Superintendent of Police Shahaji Umap along with Director General of Anti-Terrorism Squad Sadanand Date and officers-employees of Rural Police Force while inaugurating the two-wheeler of Rural Police Emergency Squad. esakal
नाशिक

Nashik Police Bike Squad: नागरिकांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलिसांचे 27 दुचाकींचे पथक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Bike Squad : आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळवून देण्यासाठी डायल ११२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांना २७ दुचाकी प्राप्त झाल्या असून, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते आज ग्रामीण पोलिसांना दुचाकींचे लोकार्पण करण्यात आले. (27 bike squads of rural police to help citizens nashik news)

जिल्हा पोलिसप्रमुख शहाजी उमाप यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. अपर अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक नितीनकुमार गोकावे, बिनतारी संदेश विभागाचे निरीक्षक गोकुळ पवार आदीसह पोलिस अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

राज्यभर एकाच क्रमांकावर कुठूनही मदत मिळवता येते. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिक टोल फ्री डायल क्रमांकाद्वारे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करू शकतात.

नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पोलिस नियंत्रण कक्षातून मदतीसाठी फोन आलेल्या घटनास्थळापासून जवळ असलेल्या वाहनाला तातडीने मदतीसाठी पाठविण्याची सोय आहे. घटनास्थळी गेल्यानंतर ‘इमर्जन्सी रिस्पॉस व्हेईकल’ आपत्कालीन स्थितीत मदत देऊ शकते, अशी या व्यवस्थेची रचना आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक ग्रामीण भागात सप्टेंबर २०१९ पासून डायल ११२ क्रमांक कार्यान्वित आहे. या उपक्रमांतर्गत आपत्कालीन स्थितीत मदत पुरविण्यासाठी आणखी वाहनांची गरज होती.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून १२ होंडा शाईन दुचाकी, तर जिल्हा नियोजन समितीकडून १५ बजाज पल्सर दुचाकी अशा एकंदर २७ दुचाकी पुरविण्यात आल्या आहेत. ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेल्या या दुचाकीमुळे आता ग्रामीण त्वरित आपत्कालीन स्थितीत घटनास्थळापर्यंत मदत पोचविणे शक्य होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT