सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सोमवारी (ता.१६) सकाळी अकराच्या सुमारास आयशर ट्रकमधून निदर्यपणे कोंबून घेऊन जाणाऱ्या २७ म्हशींची (Buffaloes) एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी ट्रकचालक समीर अहमदखान (३७, धारावी, मुंबई) यास ताब्यात घेण्यात आले आहे. (27 buffaloes rescued at sinnar Nashik News psl98)
सिन्नर-शिर्डी मार्गावरून आयशरमधून (एमच 04, जेयु ३५१३) बेकायदेशीरपणे व निर्दयतेने काही म्हशींची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी हॉटेल मुंबई ढाब्याजवळ ट्रक अडवून पाहणी केली असता ट्रकमध्ये २७ लहानमोठ्या म्हशी आढळून आल्या.
ट्रकचालक समीर अहमद खान एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकदेखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, म्हशींची सुटका केल्यानंतर माळेगाव शिवारात जिंदाल फाट्यासमोरील संजय चोथवे यांच्या हरीओम गोशाळेत म्हशींनी सोडण्यात आले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन कळकळ, विनोद इप्पर, स्वप्नील पवार तपास करीत आहेत.
गोंदेश्वर मंदिरामागे आढळले 16 बैल
सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिराच्या मागे सोमवारी दुपारी जवळपास सोळा बैल बांधलेले आढळून आले. नागरिकांनी याबाबत सिन्नर पोलिसांना माहिती दिली. अज्ञाताने हे बैल येथे बांधून पोबारा केल्याचे समोर आले. मात्र त्याचा उद्देश अद्याप समजलेला नाही. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बैलांनादेखील हरीओम गोशाळेत सोडण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.