Nashik News : शहरातील पंचवटी तपोवन येथून गुरुवार (ता. ४) रात्री प्राणी मित्र पुरुषोत्तम आव्हाड यांनी ८२ उंटांना ताब्यात घेऊन अंबड औद्योगिक वसाहतीतील पांजरपोळ येथे सुरक्षित घेऊन गेले.
आज पुन्हा दिंडोरी रोडवर २९ उंटांना प्राणी मित्रांच्या पथकाने ताब्यात घेतले. या सर्व उंटांना पांजरपोळ येथे नेण्यात आले. (29 camels seized again on Dindori Road Examination of 111 camels by medical team at Panjarpol Nashik News)
आज सकाळी पुन्हा प्राणीमित्र आव्हाड यांना दिंडोरी येथून फोन आला की दिंडोरी रस्त्याने देखिल २९ उंट नाशिकच्या दिशेने येत आहेत. या उंटांना घेऊन जाणारे इतरत्र कुठेही जाऊ नये, यासाठी प्राणिमित्रांचे पथक तयार करू त्यांच्या मागावर पाठविण्यात आले.
त्यानंतर ही उंट ढकंबा, म्हसरूळमार्गे मखमलाबादरोडवर आल्यानंतर प्राणीमित्रांनी पोलिसांच्या ११२ नंबर वर मदतीसाठी फोन केला. अवघ्या काही मिनिटात म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
प्राणिमित्रांसह पुरुषोत्तम आव्हाड यांनी सर्वं माहिती पोलिस प्रशासनास दिल्यानंतर पोलिसांनी एकूण २९ उंटांना पोलिस संरक्षणात अंबड औद्योगिक वसाहतीतील पांजरपोळ येथे पोचवले. पांजरपोळ येथे एकूण १११ उंट झाले असून त्यांची पांजरपोळ प्रशासन व प्राणी मित्र देखभाल करीत आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
१८ उंट असाह्य
वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी सचिन वेंधे यांनी पांजरपोळ येथे जाऊन सर्वं उंटांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये १८ उंट असाह्य असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना सलाईन देण्यात आली. काही उंटांना इंजेक्शनही देण्यात आले.
मंगलरूप गो शाळा (नाशिक) यांच्या वतीने पांजरपोळ येथील उंटासाठी ११ टन ऊस पाठवण्यात आला. प्राणीमित्रांनी एकत्र येऊन १०० किलो गूळ व २०० किलो शेंगदाणे पाठविले. यामुळे उंटाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
ही उंट कोणाची आहेत याबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नसून या उंटाची वाहतूक करणाऱ्यांपैकी एकही इसम पांजरपोळ येथे भेटण्यासाठी अथवा साधी विचारपूस करण्यासाठी आला नसल्याचे प्राणी मित्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आज पांजरपोळ येथे जमा करण्यात आलेल्या सर्वं उंटांना टॅगिंग करण्यात आले असून या उंटाच्या देखभालीसाठी पांजरपोळ प्रशासनासह प्राणी मित्र देखिल सज्ज असल्याचे दिसून आले.
दरम्यान, नाशिक शहरातील लव्ह जिहादचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी निवेदनाद्वारे नाशिकच्या गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या उंटांना जीवदान मिळाले असून हे सर्व उंट पांजरपोळ येथे ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
तसेच यापुढे सुद्धा पशुधन कत्तलीपासून रोखण्याची आमची मोहीम अशीच सुरु राहील, असेही गजू घोडके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.