Jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: लाचखोर आयुक्तांसह तिघांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफओ) कार्यालयात दोन लाखांच्या लाचप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेले विभागीय आयुक्त संशयित गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा, ईपीएफओ एजंट बी. एस. मंगलकर यांना जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. (3 arrested along with bribe taking commissioner Nashik Crime)

तिघांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. २८ डिसेंबरला ‘सीबीआय’च्या पथकाने ही कारवाई केली होती. एका कंपनीच्या प्रकरणात दोन लाखांची लाच स्वीकारताना ‘सीबीआय’चे पोलिस निरीक्षक रणजितकुमार पांडे, गजानन देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

संशयितांच्या घरझडतीत मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. संशयितांतर्फे जामीन अर्ज दाखल केले असता, त्यावर दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT