JCB while removing the filling of the fallen bridge esakal
नाशिक

Nashik News: इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी 3 कोटी; आमदार सुहास कांदेचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : शहरातून गेलेल्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा कठडा कोसळल्यानंतर सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी आमदार सुहास कांदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेली मागणी मंत्री श्री. चव्हाण यांनी मान्य केली आहे.

पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याने सदर पुलाचे काम तातडीने पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. (3 Crore for Indore Pune National Highway Repair Follow up of MLA Suhas Kande Nashik News)

मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा कठडा कोसळल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदर मार्ग बंद केल्याचा फटका शहरातील दोन्ही भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत होता.

सदर पुलाची तत्काळ दुरुस्ती करीत प्रवाशांची अडचण दूर व्हावी यासाठी आमदार सुहास कांदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली होती.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदर राष्ट्रीय महामार्गाचे महत्त्व ओळखून तत्काळ मागणीचा विचार करून मान्यता दिली आहे. त्यानुसार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदर मार्गाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. दीड महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.

आमदार कांदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, नांदगाव तालुका मतदार संघातील मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्ग तथा मालेगाव-मनमाड- कोपरगाव राज्यमार्ग क्रमांक ८ या पुलाचा संरक्षण कठडा कोसळल्यामुळे पूल बंद करण्यात आला आहे.

सदर पूल बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सदर निधीतून पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

"इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कठडा कोसळल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदर पूल बंद झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय पाहता याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने ३ कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून पूल दीड महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल."

- सुहास कांदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT