Fraud Crime esakal
नाशिक

Fraud Crime : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत 3 कोटीचा गैरव्यवहार; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

ओझर (जि. नाशिक) : येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी पोलिसांनी रोखपालसह पाच जणांवर गुन्हा दाखल केले आहे. यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. (3 crore misappropriation in Ozar Siddhivinayak Credit Institution Four arrested Nashik Fraud Crime news)

चार वर्षांपासून संस्थेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत ३ कोटी ३३ लाख रुपयांची आपल्या अधिकाराचा गैरवापर दुसरीकडे वळविली होती. जुलै महिन्यामध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर ओझर सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. या अपहारामुळे ठेवीदारांमध्ये घबराट झाल्याने ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी सुरवात केली होती. दरम्यान सिद्धिविनायक पतसंस्थेने सभासदांची सभा घेत बँकेची स्थिती भक्कम असून कोणीही घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले होते.

अखेर संस्थेचे सीए तुषार पगार यांनी ओझर पोलिस ठाण्यात पतसंस्थेत तीन कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ओझर पोलिस यांनी रोखपाल दिनेश शौचे, वृंदा शौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके, प्रमोद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक राहाटे करत आहे.

चार वर्षापासून अपहार

पतसंस्थेत सुमारे चार वर्षापासून अपहार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित हा २०१८ पासून बँकेची रक्कम इतर वळवित अपहार करत होता. मात्र अपहार होत असून देखील अधिकारी यांनी काहीच का कारवाई केली नाही असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT