remdesivir black market Google
नाशिक

नाशिकमध्ये 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; मेडिकल बॉयसह 3 नर्स ताब्यात

पोलिसांनी दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांस विकणाऱ्या एका मेडिकल बॉय सोबत तीन नर्सना ताब्यात घेतले आहे

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे यातच कोरोना बाधिंना आवश्यक असलेले रेमडेसिव्हिरइंजेक्शनचा मात्र काळाबाजार बिनबोभाट सुरूच आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन आणि आडगांव पोलिसांच्या पथकाने संयुक्त करवाई करीत शहरातील पंचवटी भागातून 'रेमडेसिव्हिर' चे दोन इंजेक्शन ५४ हजार रुपयांस विकणाऱ्या एका मेडिकल बॉय सोबत तीन नर्सना ताब्यात घेतले आहे. (3 nurses with medical boy were arrested in Nashik for black-marketing of Remdesivir injection)

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी (दि.१३) रात्री पंचवटी परिसरात दोन युवती या दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अन्न निरीक्षक सुरेश देशमुख यांना मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे देशमुख आणि आडगांव पोलिसांनी एक पथक तयार केले व बनावट ग्राहक बनवून संबधित युवतींना संपर्क साधला असता मुंबई आग्रा महाार्गावरील के. के. वाघ कॉलेज समोर भेटण्याचे ठरले.

त्यानुसार बनावट ग्राहकाकडे २७ हजार प्रमाणे दोन रेमडीसीव्हिर'साठी ५४ हजार रुपयांची मागणी केली. सदर व्यवहार सुरू असतानाच पथकाने संशयित श्रुती रत्नाकर उबाळे (२१) व जागृती शरद शार्दूल (२१ दोघी रा. जत्रा हॉटेल चौफुली, नाशिक) या दोघींना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता ,त्यांनी संशयित स्नेहल अनिल पगारे (२२, रा. शांतीनगर, मनमाड) आणि कामेश रवींद्र बच्छाव (उदय कॉलनी, नाशिक) यांच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबूली दिली.

अन्न निरीक्षक सुरेश देशमुख यांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलिसांनी या चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून दोन रेमडिसीव्हिर इंजेक्शनसह दुचाकी व मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांना शुक्रवारी (ता.१४) दुपारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, औषध निरीक्षक सुरेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक चांदनी पाटील, पोलीस नाईक राकेश बनकर, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, सुरेश नरवडे, वाढवणे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, गणपत ढिकले, अर्चना पाटील, भोसले, चालक बेंडकुळे, अरुण गवांदे, शिंदे आदींच्या पथकाने केली.

पंचवटीत तिसरी घटना

रेमडीसीव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विक्री पंचवटीत घटना घडल्या आहेत. एका घटनेत डॉक्टर तर दुसऱ्या घटनेत वार्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरात पंचवटीत तिसरी घटना घडली आहे. रेमडीसीव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

या प्रकरणात आणखी काही संशयित असण्याची शक्यता आहे त्या दिशेने तपास सुरू आहे. तीनही नर्स मुंबई नाका येथील फॉर्च्युन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.चौथा संशयित गोविंदनगर येथील अपेक्स हॉस्पिटलमधील मेडिकल बॉय असल्याचे समजते.

- इरफान शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगांव पोलीस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT