सुरगाणा (नाशिक) : सुरगाणा (surgana) शहरातील 3 युवकांवर संक्रांतीचे (sankrant) अरिष्ट कोसळले आहे. "अति घाई संकटात नेई" म्हणीचा प्रत्यय आला असून एकाच वेळी 2 तरुण्यांच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.
निकाला आधीच उमेदवाराचा मृत्यू.
पंकज जयराम पवार हा सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फै निवडणुक लढविली होती. तो नाशिक येथील महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे तिस-या वर्षात शिक्षण घेत होता. आई वडील नसलेला अनाथ मुलगा होता. अत्यंत कठोर परिस्थिती वर मात करीत, मोलमजुरी करत आपले शिक्षण तो घेत होता. परंतु काळाची झडप आली आणि दुचाकीच्या अति वेगावर नियंत्रण न राहिल्याने सुटल्याने दुचाकी झाडावर आपटून दोन युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
दुचाकी 25 ते 30 फुट खोल खड्ड्यात
ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी घागबारी येथे रात्री १०.४५ वाजेच्या दरम्यान (ता.१४) दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. यामध्ये राहुल गोपाळ चौधरी (वय. २३),रा. उबरपाडा( सु),भोला हिरामण बागुल (वय २२), रा. साबरदरा ह.मु. सुरगाणा, पंकज जयराम पवार (वय २१) बोरपाडा कोटंबी ह.मु. सुरगाणा अशी दुचाकीस्वारांची नावे असून ते तिघेही रात्री वण कडून सुरगाणाकडे दुचाकीवरून येत असतांना घागबारी फाट्याच्या पुढील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी एका झाडावर आदळून जवळपास 25 ते 30 फुट खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. गाडीचा स्पीड १२७ वर लाॅक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत्यूचा सापळा
घागबारी फाटा ते भितबारी खिराड फाटा हा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या टप्प्यात आजपर्यंत 40 ते 45 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिस पाटील गायकवाड यांनी सांगितले. या वळणावर अरुंद फरशी असल्याने दुसरे वाहन समोर आल्यावर चालकाचे लक्ष विचलित होऊन घाबरगुंडी उडते. तसेच या अंतरावर कोठेही अपघात प्रवण क्षेत्र अथवा वळणावर दिशादर्शक फलक,बाण नाहीत.
तरूण इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात शिकत होता
यामध्ये राहुल गोपाळ चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कमरेच्या मणक्यांमध्ये दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी पंचायत समितीचे सदस्य एन.डी.गावित यांनी नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तर भोला हिरामण बागुल व पंकज जयराम पवार यांच्या डोक्याला गंभीर मार इजा झाल्याने ते जागीच ठार झाले आहेत. घागबारीचे पोलिस पाटील गोपाळ गायकवाड, माजी सेवा निवृत्त मुख्याध्यापक चिंतामण गायकवाड, पंडित तुंगार पोलिस पोलिस गोतुर्णे यांनी घटनास्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेतून वणी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पंकज व भोला यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अनाथ होता भोला..
भोला हा ग्रामसेवक हिरामण बागुल यांचा एकुलता एक चिरंजीव होता. चिरंजीव असून पंकज हा अनाथ मुलगा होता. त्याने परिस्थितीवर मात करीत इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षात नाशिक येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा सांभाळ सुरगाणा गावाचे दिवंगत पोलिस पाटील रामभाऊ भोये यांनी त्याचा सांभाळ केला होता. नंतर चंद्रकांत भोये हे सांभाळ करीत होते.नुकत्याच झालेल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली होती. त्याचा निकाल येत्या १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर राहुल हा शिक्षक भास्कर चौधरी याचा सखा पुतण्या तर एन.डी.गावित यांचा भाचा आहे. तिन्ही युवकांवर संक्रांत कोसळल्याने सुरगाणा शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस गोतुर्णे, गवळी, पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडके, पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.