Muslim brothers while buying shirkhurma making things esakal
नाशिक

Ramzan Eid 2023 : शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा तडका; खरेदी- विक्रीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Eid 2023 : शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा प्रचंड तडका बसला आहे. त्यासाठी लागणाऱ्या सुकामेवा दरांमध्ये सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. त्याचा खरेदी- विक्रीवर परिणाम झाला आहे. (30 percent hike in dry fruit rates nashik news)

रमजान पर्वातील तीस दिवसांच्या रोजांची सांगता रमजान ईदला शिरखुर्मा सेवन करून होत असते. ईदच्या पुढील चार ते पाच दिवसात आप्तसंबंधी आणि मित्रपरिवार एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ प्रमाणे शिरखुर्म्याचे सेवन करत असतात.

शिरखुर्मा तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या सुकामेवा वापरला जातो. यंदा दरांमध्ये सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. पिस्ता आणि खारीक दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. तर काजू, बदाम आणि खोबरे यांचे दर सुमारे १०० रुपयांनी कमी झाले आहे. शिरखुर्मा तयार करताना याच तीन गोष्टींची अधिक मागणी असते. त्यांचे दर कमी झाल्याने नागरिकांनी काहीसे समाधान व्यक्त केले.

पिस्त्याचे दरात सर्वाधिक सुमारे ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीने शिरखुर्म्याच्या गोडव्यास महागाईचा तडका बसल्याचे दिसून येत आहे. शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदीचे प्रमाण निम्मे झाले आहे. एक किलो किंवा अर्धा किलोच्या जागी पावशेरवर खरेदीवर समाधान मानले जात आहे. असे असले तरी रमजान ईदला शिरखुर्मा तयार करणे आवश्यकच आहे. महागाई असतानाही सुकामेवा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून दुकानावर गर्दी होताना दिसत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

खोबऱ्यास वाढली मागणी

शिरखुर्मा तयार करताना काजू, बदाम, पिस्ता अशा विविध प्रकारच्या सुकामेवा व खोबऱ्याचा वापर केला जातो. काजू बदाम आणि खोबरे यांचे दर कमी झाले आहे. अन्य सर्व सुकामेव्याचे दर वाढल्याने बहुतांशी मुस्लिम बांधव सुकामेव्याचे प्रमाण कमी करून खोबरे अधिक खरेदी करत आहे. त्यामुळे खोबऱ्याची मागणी वाढली आहे.

"सुकामेवा खरेदी- विक्रीवर महागाईचा परिणाम झालेला दिसून येत आहे. वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. खोबरे दरांमध्ये घट झाल्याने नागरिकांकडून काही समाधान व्यक्त केले जात आहे." - धनंजय झांझरीकर, विक्रेता

असे आहेत दर

सुकामेवा दर (प्रतिकिलो)
काजू ८००
बदाम ८००
पिस्ता २ हजार ४००
किसमिस ३००
चारोळी १ हजार ६००
खसखस १ हजार ८००
खोबरे १२५
खारीक(खजूर) ३४०
वेलची ३०००
शेवई १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT