Nashik IT Raid : देशभरात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण असले तरी पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी आहे. भविष्यात अधिक आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या या क्षेत्रात जवळपास तीनशे कोटी रुपयांची रोख गंगाजळी ओतण्यात आल्याने त्यातून आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात रोख स्वरुपातील गंगाजळीच्या मुख्य स्रोतापर्यंत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठपर्यंत पोचता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (300 Crore Investment Raid Second consecutive day of inquiry by Income Tax Department nashik news)
नाशिक शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून नामवंत बांधकाम व्यवसायिकांच्या आस्थापना तसेच निवासस्थानांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. आयकर विभागाच्या कामाचा हा भाग असला तरी या निमित्ताने रिअल इस्टेट क्षेत्र चर्चेत आले आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहे. सध्या शिर्डी ते भिवंडी या दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू होईल, असा दावा केला जात आहे.
तसे झाल्यास नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीच्या किमती वाढतील. दक्षिण मुंबईत राहणारा मोठा वर्ग लोणावळा, खंडाळा व कर्जत ऐवजी इगतपुरी, घोटी भागात वीकऐंडसाठी दाखल होईल. त्याचबरोबर उत्तर भारतात पोचण्यासाठी समृद्धी महामार्गाचा उपयोग होईल.
दुसरीकडे सुरत- चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाचे भूसंपादनाचे काम सध्या सुरू आहे. या माध्यमातूनदेखील दक्षिण भारतात पोचणे सोपे होणार आहे. समृद्धी व ग्रीनफिल्ड या दोन्ही मार्गांना नाशिक मध्ये इंटरचेंज देण्यात आला आहे.
नाशिक मेट्रो निओ, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादन, नाशिक पुणे महामार्गाचे विस्तारीकरण यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे येत्या काही काळात नाशिकचे महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे येथे आत्ताच गुंतवणूक करणे सोईस्कर आहे.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
यामुळे पैशाने पैसा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे बोलले जात आहे. सदरची रक्कम ही ३०० कोटींच्या आसपास असून सदरची रक्कम ही वाढण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याने आयकर विभागाची नजर नाशिक शहरातील बांधकाम व्यवसायावर पडल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात
पुणे, औरंगाबाद व नाशिकच्या आयकर विभागाच्या पथकामार्फत गुरुवारी दहा बांधकाम व्यवसायिकांची चौकशी करण्यात आली. त्यांचे निवासस्थान व कार्यालयीन आस्थापना मधील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.
सदरची कारवाई दुसऱ्या दिवशी देखील सुरू होती. अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या दिवसाच्या कार्यवाही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून त्याअनुषंगाने तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.