Ratangad esakal
नाशिक

Nashik : विकेंड’ला 300 पर्यटकांना रतनगडावर परवानगी

कुणाल संत

नाशिक : आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी रतनगड (जि.नगर) येथे पर्यटकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता यापुढे प्रत्येक विकेंडला केवळ ३०० पर्यटक यांनाच रतनगड परिसरात परवानगी दिली जाणार असल्याचा निर्णय कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी घेतला आहे. जर कोणी पर्यटक विनापरवानगी या भागात आढळून आल्यास त्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे. (300 tourists allowed at Ratangad on weekends Nashik Latest Marathi News)

पावसाळा थांबल्यामुळे व थंडीची चाहूल सुरु झाल्याने रतनगड आणि भंडारदरा परिसरातील निर्सगाचे सौंदर्य आधिक फुलले आहे. त्यामुळे पुणे, नगर, नाशिक, मुंबई, ठाणे आदी शहराहसह आजूबाजूच्या विविध भागातून पर्यटकांची पाऊल ही भंडरदरा, रतनगड परिसरात पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी वळत आहे.

यातच शनिवार-रविवार आठवड्याची सुट्टी असल्याने रतनगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. स्थानिक वनकर्मचारी संरक्षण मजजूर यांच्याकडून पर्यटक यांना वारंवार सुचना देऊनही गडावरील आलेल्या पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वन्यजीव विभागाच्या निर्दशनास येत आहे.

त्यामुळे आता पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वन्यजीव विभागाकडून यावर उपाय म्हणून ठोस निर्णय घेण्यात आले आहे. यापुढे शनिवार-रविवार विकेंड सुट्टीला फक्त ३०० पर्यटकांना रतनगडावर जाता येणार आहे. याबाबत शेंडी व भंडारदरा पर्यटक चेक पोस्ट वर संबंधीत पर्यटक यांच्या पर्यटन शुल्क पावतीवर रतनगड परवाना संदर्भात शेरा देऊन त्यांना रतनगडावर पर्यटनासाठी जाणेबाबत परवानगी देण्यात येईल.

यासाठी स्थानिक वनकर्मचारी व संरक्षण मजूर यांच्याकडून पर्यटक यांच्याकडे असलेले पावतींची देखील तपासणी केली करण्याच्या सूचना देखील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे दिल्या आहे.

जे पर्यटक विना परवानगी अथवा सुचना देवुनही रतनगडावर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही वन्यजीव विभागातर्फे देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT