Funding esakal
नाशिक

Nashik News: औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसाठी 32 कोटी; उपजिल्हा रुग्णालयासाठी दीड कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

येवला : चिचोंडी येथील नियोजित औद्योगिक वसाहत ते अंगणगाव बायपास रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यासाठी ३२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या १ कोटी ५० लाखांची विविध विकासकामे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाली आहेत. (32 crore for roads in industrial estate one half crore sanctioned for Upazila Hospital Nashik News)

नागरिकांना रोजगार मिळावा, म्हणून मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून चिचोंडीत औद्योगिक वसाहत विकसित झाली आहे.

त्या ठिकाणी अधिकाधिक उद्योग यावेतव त्यासाठी वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी अंगणगाव ते चिचोंडी औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

या रस्त्यामुळे येथील उद्योजकांना मालाची वाहतूक करण्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

चिचोंडी औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी प्रचलित दरात २५ टक्के सवलत मिळावी, याठिकाणी मोठे उद्योजक आकृष्ट होऊन येथील उद्योगाला अधिक चालना मिळेल, यासाठी मंत्री भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू आहे.

उपजिल्हा रुग्णालयासाठी कामे

भुजबळांच्या प्रयत्नांतून १०० खाटांच्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात विविध कामे करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रुग्णालय अधिक सुसज्ज होऊन त्याचा फायदा तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयात संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, अत्याधुनिक अग्निप्रतिबंधक यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, वीज उपकरणे, पेव्हर ब्लॉकसह पावसाचे पाणी साठवण टाकी व इतर अनुषंगिक कामे होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT