मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकासह मुंबईतील परळ, हाजी बंदर, शिवडी आणि करीरोड या स्थानकांनी एकत्रितपणे ३२ कोटी ९० लाख रुपयांच्या भंगाराची विक्री केली.
मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात अव्वल स्थान मिळवले. नोव्हेंबर २०२३ पर्यंत रेल्वेच्या सर्व विभागात भंगार विक्रीतून मिळणाऱ्या टक्केवारीत सर्वाधिक वाढ झाली आहे. (33 crore scrap sale by Central Railway Including stations in Mumbai including Manmad Nashik News)
रेल्वेने सध्या शून्य भंगार उपक्रमाला गती दिली आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेचे भंगार साहित्य विक्रीसाठी काढले आहे. उपक्रमामध्ये विक्रीत भंगार विक्रीत ३४.०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
घरातून उत्पन्न मिळविण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. वयोमर्यादा पूर्ण झालेले रेल्वे इंजीन, अतिरिक्त डिझेल इंजीन, वापरात नसलेले रेल्वेरूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघातग्रस्त डब्यांसह इंजीन यासह विविध प्रकारचे भंगाराचे वर्गीकरण करीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने पाऊल उचलले आहे.
प्रत्येक विभागीय कार्यशाळा शेड हे वेळेत भंगार साहित्यापासून मुक्त करणे हे शून्य भंगार उपक्रमाचा भाग आहे.
२४८ कोटींचे उत्पन्न
मध्य रेल्वेने ३० नोव्हेंबरपर्यंत २४८ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न भंगार विक्रीतून मिळवले. भुसावळ विभागातून ७९४ दशलक्ष टन भंगाराची विक्री करीत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे प्रयत्न सुरू आहेत.
रेल्वे मंडळाने २०२३-२४ साठी ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.