Speed Breaker esakal
नाशिक

Nashik News: अपघातांना आळा घालण्यासाठी 333 गतिरोधक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाहतूक सुरक्षा समितीने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या अहवालानुसार शहरात आता नव्याने ३३३ गतिरोधक टाकले जाणार आहे. या माध्यमातून जलदगतीने वाहने चालविणाऱ्यांना ब्रेक लावता येईल. (333 traffic jams to prevent accidents Nashik News)

पंचवटी विभागात छत्रपती संभाजी महाराज महामार्गावर हॉटेल मिरची लगतच्या चौकात ८ ऑक्टोबर २०२२ ला पहाटे बस अपघात झाला. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्रांचे (अपघातांचे ब्लॅक स्पॉट) सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेसह जिल्हाधिकारी व पोलिसांना दिले होते.

यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व नाशिक महापालिकेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात शहरात २६ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळून आले. या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना सुचविण्यासाठी रेझिलिएन्ट इंडिया कंपनीला नियुक्त करण्यात आली.

कंपनीमार्फत ४५ दिवस सर्वेक्षण करण्यात आले. महापालिकेला सादर करण्यात आलेल्या अहवालात २६ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी मागील तीन वर्षांतील अपघातांचे प्रमाण, अपघातांची कारणे, रस्त्यावरील वाहनांची संख्या, स्थानिक व बाह्य वाहतूक, वाहतूक कोंडीची कारणांचा तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यात आला.

अपघात कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजना, दूरगामी उपाययोजना अशा दोन भागात अहवाल व उपाययोजना सुचविण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या आहेत उपाययोजना

ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्यासाठी गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लास्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर, सूचना फलक, नो- पार्किंग फलक लावण्याचे काम केले जाणार आहे.

त्यात ३३३ ठिकाणी स्पीड ब्रेकर, स्पीड टेबल तसेच झेब्रा क्रॉसिंग केले जाणार आहे. २३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

विभागनिहाय गतिरोधक

विभाग स्पीड ब्रेकर संख्या

पूर्व ६८

पश्चिम ३६

पंचवटी ८९

नाशिकरोड ४८

सिडको ६०

सातपूर ३२

----------------------------------

एकूण ३३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT