Amrut 2 scheme esakal
नाशिक

Nashik News : अखेर 342 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर; अमृत-२ अभियानांतर्गत निधी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराचा वाढता विस्तार व प्रगती लक्षात घेता गेल्या पाच वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेली ३४२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अखेर मंजुरी मिळाली असून अमृत-२ योजनेतून निधी प्राप्त होणार आहे.

तीस वर्षांत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून योजना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून नवीन जलवाहिन्यांचे जाळे तयार होईलच, त्याशिवाय जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्यादेखील बदलल्या जाणार आहे. (342 crore water supply scheme approved nashik news)

शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाकडून नवीन वसाहतीमध्ये वितरण व्यवस्थेचे जाळे निर्माण करण्याबरोबरच जीर्ण झालेल्या वितरण वाहिन्या बदलण्यासाठी अमृत-१ योजनेंतर्गत आराखडा तयार केला होता. पहिला आराखडा २२६ कोटी रुपयांचा होता.

परंतु महापालिकेला प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्याने उशिराने सादर करण्यात आलेला प्रस्ताव अमृत-१ चा निधी संपुष्टात आल्याचे कारण देत परत पाठविण्यात आला. सप्टेंबर २०२२ मध्ये अमृत- २ अभियानाची घोषणा करण्यात आली. त्यात नवीन पाणीपुरवठा आराखडा सादर करण्यात आला. परंतु दुसऱ्यांदा आराखडा सादर करताना किमतीत वाढ झाली.

तब्बल साडेतीनशे कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावाला तत्त्वतः मान्यतादेखील मिळाली. महापालिकेने एनजेएस या सल्लागार संस्थेच्या माध्यमातून सविस्तर अहवाल सादर केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली. आता राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. विलंब झाल्यास वाढीव खर्चाचा भार महापालिकेला सोसावा लागणार आहे.

महापालिकेवर पन्नास टक्क्यांचा भार

पाणीपुरवठा योजनेची शहराला नितांत गरज आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळालेली मंजुरी महत्त्वाची आहे. एकूण ३४२ कोटींच्या प्रस्तावात ३० वर्षांतील लोकसंख्येचा विचार कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

योजनेसाठी अमृत २ योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी प्राप्त होणार असून उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. सिंहस्थाच्या निधीतून खर्च करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळेच मार्च २०२६ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

प्लास्टिकऐवजी आता लोखंडी पाइप

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्लास्टिक मटेरिअल वापरण्याचा आग्रह धरला होता. परंतु प्लास्टिक जलवाहिन्या नादुरुस्त होण्याची अधिक शक्यता असल्याने महापालिकेने लोखंडी पाइपचा आग्रह धरला. महापालिकेची मागणी ग्राह्य धरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लोखंडी पाइपच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

काय आहे योजनेत?

- शिवाजीनगर, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण

- जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी ११.१२ कोटीचा खर्च.

- चेहेडी पंपिंग ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य वितरण वाहिनी बदलणार.

- कार्बन नाका ते रामालय जलकुंभापर्यंत ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे.

- शिवाजीनगर, बारा बंगला, गांधीनगर जलकुंभाच्या पीएससी जलवाहिनी बदलणे.

- पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र ते शक्तिनगरपर्यंत ६०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी.

- नवीन जलवाहिनीसाठी ९५.२० कोटींचा खर्च करणार.

- शहरातील जुन्या व जीर्ण जलवाहिन्या बदलणार.

- नवनगरांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणार.

- नवीन जलवाहिन्यांसाठी १७९.२१ कोटी खर्च.

- लव्हाटेनगर जलकुंभातून २४ तास पाणीपुरवठा योजना.

"शहराची तीस वर्षांची वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा आराखडा तयार करण्यात आला. नवीन योजनेमुळे पाणी गळती थांबण्याबरोबरंच समप्रमाणात पाणी पुरवठा होईल. मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल." - रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT