idols of god hanuman on godaghat esakal
नाशिक

Nashik News: हनुमानाच्या 35 प्राचीन मूर्ती दुर्लक्षित! गोदाघाटावरील ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : गोदाघाट परिसरात अनेक देव- देवतांची मंदिरे पुण्यभूमी नाशिकच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. परंतु याच परिसरातील ३५ हनुमान मूर्ती दुर्लक्षित असून, हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

याकडे राज्य व केंद्र शासनाने तसेच पुरातत्त्व विभागाने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याची भावना भाविक व नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे. (35 ancient idols of Hanuman ignored Historical relics at Godaghat on verge of extinction Nashik News)

जगाच्या नकाशावर नाशिकची ओळख प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशी होय. नाशिकमध्ये नद्या, उपनद्या आणि प्राचीन मंदिरे आहेत. गोदाघाटावर अहिल्याबाई होळकर पूल ते रोकडोबा हनुमान मंदिरापावतो एकूण ४१ हनुमान मूर्ती आहेत.

याची नोंद डीएसएलआर मॅपमध्येदेखील दिसते. यातून त्या पुरातन असल्याचा पुरावा दिसून येतो. गंगा व गोदाघाट परिसरात स्मार्टसिटीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. यात प्राचीन व पुरातन मंदिरांचा इतिहास जतन करणे, पर्यटनाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

परंतु आजची स्थिती बघता यातील जवळपास ३५ हनुमान मूर्ती भग्नावस्थेत आहेत. २०१९ मध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधत गोदाप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, पद्माकर पाटील, नरेंद्र धारणे, अतुल शेवाळे, योगेश रामैया, चिराग गुप्ता, उमापती ओझा, किशोर गरड, बाबा दोडे, नंदू पवार, जयकृष्ण दवे, ऋतुल जानी आदींनी मनपा प्रशासन, पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गोदाघाट परिसरातील ४१ हनुमान मुर्त्याचा अभिषेक करीत पूजा अर्चा केली होती.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे

भाजप हिंदुत्व मुद्द्यावर विविध निवडणुका लढवत असते. पंचवटी पावन भूमीत विविध धार्मिक स्थळे आहेत. गोदाघाट परिसरात हनुमान ४१ मुर्त्यांपैकी बऱ्याच मुर्त्या भग्नावस्थेत आहेत. याकडे लक्ष केंद्रित करून इतिहासाची साक्ष देणारा वारसा जतन करणे गरजेचे आहे, अशी भावना भक्त भाविक व नागरिकांची आहे.

"गोदाघाट परिसरात ४१ हनुमान मूर्तीपेकी काही मूर्ती भग्नावस्थेत आहे. प्रत्येक मूर्तीला वेगळा इतिहास आहे. प्राचीन मूर्तीचे संगोपनासह त्यांचे जतन राज्य सरकारच्या पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत अथवा राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले गेले पाहिजे."

- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT