election esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा मजूर फेडरेशनच्या 12 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशन निवडणुकीसाठी रविवारी (ता.२५) सकाळी ८ ते ४ या वेळात व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आर्ट, कॉमर्स, व विज्ञान महाविद्यालयात मतदान होणार आहे. ७ तालुका संचालक तर, ५ जिल्हास्तरीय संचालक पदासाठी एकूण ३६ उमेदवार रिंगणात असून १ हजार ८२ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. मतदानानंतर, सोमवारी (ता.२६) काशीमाळी मंगळ कार्यालयात द्वारका येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेशगिर महंत यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने गत महिन्यात घेतला होता. यामुळे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान होऊन मतमोजणी होणार असताना २९ नोव्हेंबर रोजी, शासनाने निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिका सुनावणीत, खंडपीठाने ही स्थगित उठविली आहे.

जिल्हा मजूर संस्थेच्या आठ तालुक्यात एक- एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने या तालुका संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. सात तालुका प्रतिनिधी संचालक सह जिल्हास्तरावरील ५ अशा एकूण १२ जागांसाठी आता ३६ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी ८ पासून महाविद्यालयातील १४ केंद्रावर मतदान होईल. मतदान व मतमोजणीसाठी १०० कर्मचा-यांची नियुक्ती केली जाआहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याचे महंत यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून काशीमाळी मंगल कार्यालयात मतमोजणी होईल.

तालुकानिहाय मतदार

नाशिक (२४७), मालेगाव (१११), दिंडोरी (५६), इगतपुरी (५३), त्र्यंबकेश्वर (२८), सिन्नर (६३), येवला (८९), सटाणा (९५), निफाड (१०८), देवळा (४६), चांदवड (५६), कळवण (४५), सुरगाणा (२०), नांदगाव (५४), पेठ (११).एकूण (१०८२)

बिनविरोध निवड झालेले तालुके

संपतराव सकाळे (त्र्यंबकेश्वर), राजेंद्र भोसले (मालेगाव), रोहित पगार (कळवण), शिवाजी रौंदळ (सटाणा), अमोल थोरे (निफाड), प्रमोद मुळाणे (दिंडोरी), प्रमोद भाबड (नांदगाव), ज्ञानेश्वर लहांगे (इगतपुरी).

हेही वाचा: E-Bike Speed : ई-बाईक ओलांडताहेत वेगमर्यादा

अशी होत आहे लढत

१) सुरगाणा ः राजेंद्र गावित विरूध्द आनंदा चौधरी

२) पेठ ः मनोज धुम, भगवान पाडवी, सुरेश भोये

३) येवला ः सविता धनवटे विरूध्द मंदा बोडके

४) देवळा ः सुभाष गायकवाड, सुनील देवरे, सतीश सोमवंशी

५) सिन्नर ः दिनकर उगले विरूद्ध भारत कोकाटे

६) नाशिक ः शर्मिला कुशारे, उत्तर बोराडे, मिलिंद रसाळ, योगेश (मुन्ना) हिरे

७) चांदवड ः शरद आहेर विरूद्ध शिवाजी कासव

जिल्हास्तरीय पाच जागा व उमेदवार

इतर मागासवर्गीय प्रवर्ग ः पवन आहिरराव, अर्जुन चुंभळे, संदी थेटे, मिलिंद रसाळ

अनुसूचित जाती-जमाती ः शशिकांत उबाळे, हेमंत झोले, किरण निरभवणे, उत्तम भालेराव, रविकांत भालेराव, अशोक रोकडे

भटक्या विमुक्त जाती-जमाती ः बन्सीलाल कुमावत, राजाभाऊ खेमनार, आप्पासाहेब दराडे, सुरेश देवकर, सुदर्शन सांगळे

महिला राखीव प्रतिनिधी (दोन जागा) ः दीप्ती पाटील, अनिता भामरे, कविता शिंदे .

नेत्यांची प्रतिष्ठापणाला

निवडणूक मजूर फेडरेशनची असली तरी तालुक्यातील विधानसभा निवडणुकीतील आजी-माजी आमदारांमध्येच ही लढत होत आहे. येवल्यामध्ये सविता धनवटे व मंदा बोडके यांच्यात लढत होत असली तरी, यामागे माजीमंत्री छगन भुजबळ विरूध्द आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे असा थेट सामना होत आहे. धनवटे यांच्यामागे भुजबळ यांनी ताकद पणाला लावली आहे. तर, बोडके यांच्यासाठी दराडे, संभाजी पवार, माणिकराव शिंदे हे त्रिमुर्ती एक झाले आहेत.

सिन्नरमध्येही अॅड. आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे विरूध्द दिनकर उगले अशी सरळ लढत होत आहे. मात्र, उगले यांच्यासाठी आमदार कोकाटे तर, भारत कोकाटे यांच्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे रिंगणात उतरले असल्याने कटयाची लढत होत आहे. यात मतदार पळवा-पळवी झाली आहे. चांदवडमध्ये शिवाजी कासव यांच्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व शरद आहेर यांच्याकरिता भाजपाचे डाॅ. आत्माराम कंुभार्डे रिंगणात उतरले असून, त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT