नाशिक : जिल्ह्यात नव्याने आढळणार्या कोरोना बाधितांच्या (Corona patients) संख्येत वाढ होते आहे. बर्याच दिवसांनंतर शनिवारी (ता.१८) दैनंदिन बाधितांचा आकडा तिसहून अधिक राहिला. दिवसभरात ३६ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले. तर पंधरा रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patients) संख्येत ऐकविसने वाढ झाली असून, सद्यःस्थितीत जिल्ह्यात उपचार घेणार्या बाधितांची संख्या १३९ झाली आहे. 36 corona positive in district Nashik corona update news)
सध्या आढळणार्या कोरोना बाधितांच्या संख्येत नाशिक महापालिका क्षेत्र केंद्रस्थानी राहात आहे. शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील सत्तावीस रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. नाशिक ग्रामीणमध्ये नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मालेगावमध्ये नव्याने बाधित आढळला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर २.११ टक्के राहिला.
दरम्यान सायंकाळी उशीरापर्यंत २९९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक १७८ नाशिक ग्रामीणमधील, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील ८९ आणि मालेगावच्या ३२ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा लागून होती.
शहरात शंभराच्या उंबरठ्यावर
गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिका क्षेत्रात सातत्याने कोरोना बाधित आढळत आहेत. अशात येथील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या शंभराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. सध्या जिल्ह्यातील १३९ सक्रिय रुग्णांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ९९ बाधितांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील ३१ व मालेगावच्या एक, जिल्हा बाहेरील आठ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.
तिघांना ऑक्सिजनची गरज
सक्रिय असलेल्या १३९ बाधितांपैकी १११ रुग्णांमध्ये कुठलेही लक्षणे आढळलेले नाहीत. २८ रुग्णांमध्ये कोरोनाविषयक लक्षणे आढळून आलेले आहेत. यापैकी तीन रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची आवश्यकता भासते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.