export place esakal
नाशिक

Nashik : लासलगावमार्गे अमेरिकेला ३६० टन आंबे निर्यात

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि. नाशिक) : भारतातील आंब्यांना (Mangoes) परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणच्या हापूस (Konkan Alphonso) आंब्याची परदेशवारीही १२ एप्रिलपासून लासलगावमार्गे सुरू झाली आहे. या हंगामात ३६० टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया (Radiation process) करून न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिल्स, शिकागो याठिकाणी आंबा निर्यात झाली आहे. (360 tons of mangoes of exported to US via Lasalgaon Nashik News)

दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची यशस्वी निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेत झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन ३६० टन आंबे अमेरिकेला रवाना झाली. २०१९ च्या तुलनेत आंबा निर्यातीत ३२५ टनने घट झाली. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये आंबा निर्यात न झाल्याने निर्यातीत घट झाली.

भारतात विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती असून, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. इतर देशांतही त्यांची निर्यात होते. या निर्यातीत विचार केला, तर यंदा लासलगावमार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाली आहे.

किरणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग देशातील चार प्रमुख यंत्रणांना उपलब्ध करून दिले जात असून, यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, गुजरातमधील वापी आणि अहमदाबाद तसेच कर्नाटकमधील बेंगळूरू केंद्रांचा समावेश आहे. प्रक्रिया करून आंबे विमानाने पाठवले जात आहेत. यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रामार्गे प्रथमच परदेशवारीही करण्यात यश आले आहे. नाशिक येथील हेमंत सानप या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आंबा निर्यातीत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

२००७ पासून अमेरिकेला झालेली भारतीय आंब्याची आवक
सन निर्यात (टन)
२००७ १५७
२००८ २७५
२००९ १२१
२०१० ९६
२०११ ८५
२०१२ २१०
२०१३ २८१
२०१४ २७५
२०१५ ३२८
२०१६ ५६०
२०१७ ६००
२०१८ ५८०
२०१९ ६८५
२०२० आणि २०२१ कोरोना प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही.
२०२२ -३६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT