नाशिक : आडगाव शिवारातील माडसांगवी भागातील एका गोदामातून रेशनच्या (Ration) धान्याचा अवैधरीत्या केलेला साठा (Illegal stock) जिल्हा पुरवठा विभागाने (District Supply Department) छापा टाकत जप्त केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील धान्यसाठा घोटाळ्याचा (Scam) प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (375 quintals of foodgrains seized by District Supply Department in Madsangvi Nashik Crime News)
माडसांगवी येथील एका रेशन दुकानदाराकडून अवैधरीत्या रेशनचा शेकडो क्विंटल साठा केला असल्याची तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी तहसीलदार अनिल दोंड व स्थानिक मंडल अधिकाऱ्यांच्या पथकाने थेट माडसांगवी येथे जात धान्याची साठवणूक केलेल्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये पथकास १७५ क्विंटल गहू, १८८ क्विंटल तांदूळ असा ३७५ क्विंटल गहू व तांदळाची पोती जप्त केली.
प्राथमिक माहितीनुसार धान्याचा साठा केलेले गुदाम हे माधव देशमुख नामक व्यक्तीच्या यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात रेशन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गहू व तांदूळ आला कुठून, इतका मोठ्या प्रमाणात धान्यसाठा कसा करण्यात आला, त्याचा काळाबाजार केला जात नव्हता ना, याचा तपास आता प्रशासनाकडून केला जाणार आहे.
"प्राप्त तक्रारीनुसार तहसीलदारांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या धान्याचा केलेला साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे." - अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.