Nashik News : तालुक्यातील उभीधोंड येथे सार्वजनिक धार्मिक उत्सवाच्या प्रसादातून ३९ जणांना विषबाधा झाली.
आठ अतिबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश मोरे यांनी दिली. (39 people poisoned in Ubhidhond Treatment of 8 severely affected patients started Nashik News)
उभीधोंड येथे सोमवारी (ता. ११) धार्मिक उत्सवानिमित्त संपूर्ण गावाला जेवण दिले होते. ग्रामस्थांनी दूध, पुरणपोळी, बटाटा-वटाणाची भाजी, पेढा व दहीचे जेवण रात्री केले.
मंगळवारी (ता. १२) पहाटे बहुसंख्य ग्रामस्थांना उलटी, जुलाब सुरू झाल्याने गावातील आशावर्करने करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चोरडीया यांना कळविले. त्यावरून प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम घटनास्थळी दाखल झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार वेळीच लक्षात आला व वेळीच उपचार मिळाल्याने ३९ विषबाधितांपैकी ३१ बाधितांवर आवश्यक उपचार करून घरी सोडण्यात आले, तर आठ बाधितांवर आंतररुग्ण विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीच्या उपचाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
तहसीलदार अनिल पुरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. दुग्धजन्य पदार्थामुळे विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.