नाशिक : शहरात पाच वर्षात अपघातात ४६७ बळी गेले असून त्यातील ३९४ मृत्यू हे विना हेल्मेट दुचाकीस्वाराचे असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक शहरात येत्या स्वातंत्र्यदिन वर्धापनापासून शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून दुचाकीस्वार नाशिककरांना हेल्मेट असेल, तरच पेट्रोलची खरेदी करता येणार आहे. अपवादात्मक परिस्थिती असल्यास पेट्रोल देण्याची तरतूद आहे. मात्र, अशावेळी दुचाकीस्वारास अपवादात्मक परिस्थितीची माहिती अर्जात द्यावी लागणार आहे.
वाहतूक सुरक्षा व हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही संकल्पना मांडली आहे. याबाबत काढलेल्या आदेशात अपवादात्मक स्थितीत दुचाकीस्वाराला पेट्रोल देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, तसे स्पष्ट कारण आणि दुचाकीस्वाराची माहिती एका अर्जात नमूद करून घ्यावी लागणार आहे. पेट्रोल पंपावर जमा झालेले अर्ज शहर वाहतूक शाखा अथवा उपप्रादेशिक परिवहन विभागाला द्यावा लागणार आहे. या अर्जाबाबत वाहतूक पोलिस चौकशी करतील. १५ ऑगस्ट पासूनच सर्व पेट्रोल पंपावर पुढील पंधरा दिवस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन बंदोबस्त पुरविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पेट्रोलपंपावर नियमानुसार सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
..तर वाहन परवाना रद्द
विशेष कारण म्हणून विना हेल्मेट वाहनधारकाला पेट्रोल दिल्यास, पेट्रोलपंप चालकाला अशा वाहनांचे क्रमांक लिहून शहर वाहतूक पोलिसांना कळवावे लागणार आहे. पेट्रोलपंपाकडून आलेली यादीतील नावांची खातरजमा करून सहाय्यक पोलिस आयुक्त संबंधितांचा परवाना रद्द करण्यासह निलंबित करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन आयुक्तांकडे पाठवतील. ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ मोहिमेसाठी पेट्रोलपंपांना गरजेनुसार पोलिस उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच या काळातील दर ४५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पेट्रोल पंप चालकांकडून पोलिस उपायुक्त आणि विशेष शाखेकडे द्यावा लागणार आहे.
पाच वर्षातील मृत्यू
अपघात- मृत्यू - दुचाकीस्वारांचे मृत्यू - हेल्मेट अभावी मृत्यू
७८२ ८२५ ४६७ ३९४
वाहतूक सुरक्षेसाठी घेतलेल्या या निर्णयाबाबतचा आदेश दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याने रस्ते अपघातांत होणारे मृत्यू चिंताजनक आहे. हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार शहरातील पेट्रोल-डिझेल डीलर्ससोबत बैठक घेत पेट्रोलपंपांवर इंधन खरेदीसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे.
- दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.