नाशिक : शहरापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघरच्या सहा वाड्या वस्त्यांचे पाण्याचे दुर्भिष्य संपुष्टात येणार आहे. या वस्त्यांसाठी आठ दिवसात ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. त्याच प्रमाणे राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत हर घर जल योजना सन २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
मेटघर (ता.त्र्यंबकेश्वर) येथे महिलांना गावापासून दूरवर असलेल्या विहिरीतून पाणी आणावे लागते. सकाळी उठल्यानंतर प्रथम पाण्यासाठी पायपीट होते. पावसाळा व हिवाळ्यात विहिरीला पाणी असते. परंतु उन्हाळ्यात तळातून पाणी खरडून काढावे लागते, अशी परिस्थिती आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे ३५ ते ४० फूट खोल विहिरीत महिला चढ-उतार करतात. यात जखमी होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. या परिस्थितीची कहाणी छायाचित्रासह प्रसार माध्यमातून बाहेर पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या (Department of Rural Water Supply) वतीने पाणी पुरवठ्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात माहिती देताना जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या, मेटघरच्या वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची आहे. त्यावर दीड महिन्यांपूर्वी काम सुरू झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आहे. योजनेंतर्गत वाड्या वस्त्यांना थेट नळांद्वारे पाणी दिले जाईल. आतापर्यंत नऊशे मीटरपर्यंत नळ योजनेचे काम पूर्ण झाले असून पाचशे मीटर पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या पावसाच्या दोन्ही तालुक्यातील पाण्याची पातळी विविध कारणांनी खालावली आहे. येथे कायमस्वरूपी पाण्याची उपाययोजना करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च केले जाणार असून कायमस्वरूपी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल, असे श्रीमती बनसोड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.