vinayak dilip jatin ravindra esakal
नाशिक

Nashik Accident News: वणी- सापूतारा रस्त्यावर खोरीफाटा येथे अपघातात 4 मित्र ठार, 9 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : वणी - सापुतारा महामार्गावर खोरी फाट्या जवळ मारुती सियाज व क्रृजर यांच्या समोरा समोर धडक झाल्याने मारुती सियाज या कार मधील चौघा तरुण मित्र ठार झाले असून चौघेही वणी येथील रहिवाशी होते. (4 friends killed 9 injured in an accident at Khoriphata on Vani Saputara road Nashik News)

शुक्रवार, ता.३० जुन रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. यात विनायक गोविंद क्षिरसागर. वय ३७, योगेश दिलीप वाघ.वय १८, जतिन अनिल पावडे वय २३ व रविंद्र मोतीचंद चव्हाण. वय. २२ रा. मोठा कोळीवाडा,

वणी हे सियाज कार नं.एम एच ४१ व्ही ७७८७ ने सापुताऱ्याकडुन वणीच्या दिशेने येत असतांना समोरुन येणारी क्रुजर गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली यात विनायक क्षिरसागर, योगेश वाघ यांचा जागीच तर जतिन पावडे व रविंद्र चव्हाण यांचा नाशिक येथे जिल्हा रुग्णालयैत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

तर क्रुझर मधील कमळी युवराज गांगोडे, वय ४०, कल्पना सुभाष सोळसे, वय १९, तुळशीराम गोविंदा भोये वय २८, ललीता युवराज कडाळे वय ३०, रोहिदास पांडुरंग कडाळे, वय २५, योगेश मधुकर सोळसे वय १५, सुभाष काशिनाथ सोळसे वय १५, देवेंद्र सुभाष सोळसे,

वय ४७, नेहल सुभाष सोळसे वय ७ हे सर्व रा. केळवण, ता. सुरगाणा गंभीर जखमी झाले असून वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर १०८ व खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वणी ग्रामिण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल महाले यांच्या मदतीला नेहमी प्रमाणे पांडाणे आरोग्य केंद्राचे डॉ. प्रकाश देशमुख, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. अनिल शेळके, डॉ. आहेर, डॉ. योगेश पाटील, डॉ. वैभव मोहीते आदी खाजगी डॉक्टर धावून येत त्यांनी जखमींवर उपचार केले.

दरम्यान एकाच वेळी वमी गावातील चार होतकरु तरुणांचा मृत्यु झाल्याने वणी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहीती मिळताच वणी ग्रामिण रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 crore gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले 138 कोटींचे सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

IPL 2025 Retention : काव्या मारनची एक 'खेळी' अन् Rishabh Pant, KL Rahul, Shreyas Iyer सह बंडाला पेटली 'मंडळी'!

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

SCROLL FOR NEXT