4 lakh fraud to pesticide company nashik crime news esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : उत्तर प्रदेशातील भामट्याचा पराक्रम; कंपनीला घातला 4 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : कीटकनाशक कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट विक्रीसाठी उत्तर प्रदेशात नेमलेल्या विक्री अधिकाऱ्यानेच कीटकनाशक मालासह लॅपटॉप व मोबाईल यांचा अपहार करीत कंपनीलाच तीन लाख ९३ हजार ५३७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (4 lakh fraud to pesticide company nashik crime news)

विवेककुमार कैलासनाथ त्रिपाठी (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे संशयित विक्री अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक येथील एका कीटकनाशक कंपनीचे वसुली व्यवस्थापक प्रशांत रमेश चव्हाण (रा. सोमनाथ पार्क, दिंडोरी रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, कंपनीच्या कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी उत्तर प्रदेशात विक्री अधिकारी नेमायचा होता.

त्यासाठी कंपनीने २० जानेवारी २०१७ ला संशयित त्रिपाठी यांस अटी-शर्तींसह नियुक्तिपत्र देत विक्री अधिकारी पदावर नेमले. कामासाठी संस्थेने त्याला लॅपटॉप, मोबाईल आणि कंपनीच्या प्रचाराचे साहित्य दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही दिवस व्यवस्थित काम केल्यानंतर त्रिपाठीने कामात घोळ करण्यास सुरवात केली. उत्तर प्रदेशातील कासमंडीतील एका दुकानदाराने तीन लाखांचा माल संस्थेला परत करण्यासाठी दिला.

माल व पैसे त्रिपाठीने संस्थेकडे पाठविले नाहीत. त्याचप्रमाणे, सरोजनीनगर येथील एका दुकानाचेही ९३ हजारांच्या मालाबाबतही तेच केले. याबाबत संस्थेने त्रिपाठी याच्याकडे विचारणा केली असता, काही दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे देईल, असे सांगितले.

२०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर संस्थेने त्याला वेळोवेळी विचारणा करूनही त्याने पैसे व साहित्य परत केले नाही. त्यामुळे संस्थेतर्फे पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT