Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : 9 गोवंश अन् पिकअपसह 4 लाखांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात कत्तलीच्या उद्देशाने जाणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये (एमएच ०४ इएल ३५५४) निदर्यीपणे कोंबून नेणारे नऊ गोवंश व पिकअपसह चार लाख १७ हजार रुपयांचा ऐवज किल्ला पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने जप्त केला. पोलिसांनी कणखर भूमिका घेतल्याने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गोवंश जप्तीची कारवाई जोमाने सुरु आहे. (4 lakhs of cash seized along with 9 cows and pickup Nashik Latest Marathi News)

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मनमाड रस्त्याने शहरात कत्तलीसाठी पिकअपमधून गोवंश आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली. श्री. शिर्के यांनी किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर गोरक्षकांच्या मदतीने किल्ला पोलिसांनी मनमाड रस्त्यावर सापळा रचला. मनमाड चौफुलीवर पोलिसांनी संशयावरुन एका पिकअपचालकाला हात देऊन थांबण्याचा इशारा केला.

चालक पोलिसांना चकवा देत न थांबता निघून गेला. मनमाड चौफुलीच्या पुलाखालील वळणावर रस्त्याच्या कडेवर धडक बसून ही पिकअप थांबली. पोलिसांनी पिकअपची तपासणी केली असता नऊ गोवंश कोंबलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिस शिपाई किशोर नेरकर, सचिन भामरे, भोये, बागूल आदींनी मध्यरात्री एकच्या सुमारास ही कारवाई केली.

किल्ला पोलिस ठाण्यात फईम खान रहीस खान (रा. इस्लामपुरा), असलम शेख आहद कुरेशी (रा. दरेगाव) व आमिर हमीद खान (रा. मोमीनपुरा, तिघे रा. मालेगाव) यांच्याविरुद्ध श्री. भामरे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक लाख १७ हजार रुपये किमतीचे गोवंश व तीन लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा चार लाख १७ हजारांचा ऐवज जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT