On Saturday (14th), the forest department caught a fourth female leopard in the field of farmer Trimbak Bhangre. esakal
नाशिक

Nashik Leopard News : नायगाव खोरे भागात एकाच ठिकाणी 4 बिबटे अडकले पिंजऱ्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard News : येथील शिवारात नाशिक पश्चिम वनविभागाच्या बिबट्या शोधा अन् पकडा मोहीमेत पांदीचा ओहोळ भागात चौथ्या मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. नायगाव खोरे भागात चार बिबटे पकडलेले गेल्याने ग्रामस्थांचा नवरात्रोत्सवातील आनंद द्विगुणित झाला आहे.

एकाच ठिकाणी दोन मादी अन् दोन नर बिबटे असे एकुण चार बिबटे सिन्नरच्या वनक्षेत्रात हद्दीत पहिल्यांदा रेक्यू झाले आहे. त्यामुळे महिन्याभरापासून बिबट्याच्या धास्ती जी घबराटीचे स्थिती निर्माण झाली होती. (4 leopard got trapped in cage at one place in Naigaon Khore nashik news)

ती नवरात्रोत्सव काळात कमी झाली आहे. नायगावच्या सायखेडा रस्त्याला पांदीचा ओहोळ यातील शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या शेतात सलग तीन दिवस तीन बिबट्यांना रेक्यू करण्यात आले.

नाशिक पश्चिम वनविभागाने पांदीचा ओहोळ ठिकाणी वेब कॅमेरा लावला. त्यात बिबट्यांच्या हलचाली दिसल्या. त्यामुळे चार वेळा पिंजरा येथे उभारला. त्यात सावज शेळी ठेवण्यात आली. पांदीचा ओहोळ ठिकाणी ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातून पहिले दोन बछडे त्यानंतर त्यांची आई मादी बिबट्या अडकले. त्यांना पिंजरा भोवती सोडविताना आणखी बिबट्या दिसला. तो बिबट्या दोन वेळा विकारासाठी सावजांकडे आला.

परंतू सावज न हेरता त्याने मुक्त विहार करून गेला. भांगरे जेजूरकर मळ्यात त्यामुळे सारखे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी (ता.14)ला रात्री पिंजरात बिबट्या अडकला. वनरक्षक संजय गिते यांच्या सह वनकर्मचारी यांनी स्थानिक ग्रामस्थांची गर्दी होण्यापूर्वी सकाळी सहाला मादी बिबट्याला रेक्यू केले आहे.

चार बिबट्यांना प्राणी संग्रहालयात पाठवा ना....

नायगाव खोरे बिबट्या हल्लाने अन् दहशतीने संवेदनशील झाले होते. सकाळ ने बिबट्या शोधा अन् पकडा मोहीम व तेथील वास्तव् स्थिती बाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. वनखात्याने नायगाव ला चार पिंजरे उभारले.

पण बिबट्यांची फॅमिली पांदीचा ओहोळ ठिकाणी अडकली आहे. शिवारात बिबट्या दहशतीचे वातावरण कमी झाले आहे. दोन नर दोन मादी बिबटे रेक्यू झाले. त्यात ग्रामस्थ सह वनरक्षकांवर हल्ला करणारा मादी बिबट्या आहे. सर्व एकाच ठिकाणी पकडलेले बिबट्या यांना नैसर्गिक वनहद्दीत सोडताना ते बोरीवली प्राणीसंग्रहालयात सोडले पाहिजे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी सकाळ कडे केली आहे.

"नायगाव ला एकाच ठिकाणी चार बिबटे अडकले आनंद वाटला.आज सकाळी शेतकरी मोहसीन अत्तर यांच्या शेतात बिबट्या विहार करताना आम्ही पाहिला आहे" - संतोष जेजूरकर शेतकरी नायगाव

"आम्ही बिबट्या शोधा अन् पकडा मोहीमेत आजपर्यंत चार बिबट्यांना रेक्यू केले. सर्व बिबट्यांची फॅमिली आहे. ग्रामस्थांनी खुप सहकार्य केले आहे"- संजय गिते वनरक्षक नायगाव

" वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेत चांगली मेहनत घेतली आहे. वन्यजीवाला पकडणे सोपे नाही. आम्ही त्यांचे कौतुक करतो"- शेतकरी लक्ष्मण कातकाडे शेतकरी नायगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT