Onion crisis esakal
नाशिक

Nashik : कृषी पंढरीत एप्रिलमध्ये अवकाळीने झोडपले 43 हजार हेक्टर क्षेत्र; सर्वाधिक कांदा-द्राक्षांचे नुकसान

नुकसानीपोटी ७८ कोटींच्या निधीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik : कृषी पंढरी नाशिक जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल आणि १५ व १६ एप्रिलला अवकाळी पाऊस, जोरदार वाऱ्यासह गारपिटीने ४३ हजार ३४० हेक्टर ८१ आर क्षेत्रावरील पिके झोडपली आहेत. त्यात सर्वाधिक ३५ हजार २९० हेक्टर कांद्याचे अन ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्र द्राक्षांचे आहे.

जिल्ह्यातील १ हजार ९७ गावातील ७९ हजार ४३८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या ३३ टक्क्यांहून अधिक झालेल्या नुकसानीपोटी ७६ कोटी ८६ लाख २६ हजार रुपयांच्या मदतीची मागणी कृषी विभागातर्फे नोंदवण्यात आली आहे. (43 thousand hectare area hit by bad weather in April in Krishi Pandhri Most onion grapes damage Nashik news)

एप्रिलमधील ८ दिवसांमधील नैसर्गिक आपत्तीचे कृषीच्या प्राथमिक अंदाजानुसार ३७ हजार ९८१ हेक्टर ७९ आर क्षेत्र होते. आपत्तीच्या अंतिम अहवालानुसार ५ हजार ३५९ हेक्टर २ आर क्षेत्राची भर पडली आहे.

कोरडवाहू क्षेत्रातील ३ हेक्टर १० आर मक्याचे येवल्यातील ३ गावातील ५ शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र आहे. हेक्टरी साडेआठ हजार रुपयांनुसार या शेतकऱ्यांसाठी २६ हजार रुपयांची मदत मागण्यात आली आहे.

तसेच कांदा, कांदा रोपे, मका, मिरची, गहू, टोमॅटो, बाजरी, भुईमूग, हरभरा, भाजीपाला, ऊस, पपई, वेलवर्गीय फळे अशा बागायती क्षेत्रातील ३७ हजार ५४५ हेक्टर ५७ आर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

६६९ गावातील ६४ हजार ९७८ शेतकऱ्यांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांप्रमाणे ६३ कोटी ८२ लाख ७५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी कृषी विभागाची आहे. द्राक्षे, डाळिंब, लिंबू, पेरू, चिकू, मोसंबी, सीताफळ, आंबा, इतर अशा बहुवार्षिक फळपिकांचे ५ हजार ७९२ हेक्टर १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

४२५ गावातील १४ हजार ४५५ शेतकऱ्यांना त्यापोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे १३ कोटी ३ लाख २३ हजार रुपयांच्या मदतीची मागणी कृषी विभागाने सरकारकडे केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बागलाणमध्ये सर्वाधिक नुकसान

बागलाण तालुक्यात सर्वाधिक २२ हजार ५२९ हेक्टर २९ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. इतर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये असे : नांदगाव-६ हजार ५१३ हेक्टर ४१आर, दिंडोरी-२ हजार ७७१ हेक्टर १९ आर, सुरगाणा-१ हजार ८२३ हेक्टर ६७ आर, निफाड-१ हजार ८४० हेक्टर ३३ आर,

चांदवड-१ हजार ७०२ हेक्टर ९० आर, कळवण-१ हजार ४०३ हेक्टर ३५ आर, सिन्नर-१ हजार २८० हेक्टर ५६ आर, इगतपुरी-१ हजार २०७ हेक्टर १३ आर, नाशिक-८४३ हेक्टर ८८, देवळा-७६६ हेक्टर ६४ आर, मालेगाव-३०० हेक्टर ३६ आर, पेठ-२६२ हेक्टर ५० आर, येवला-७९ हेक्टर ९१ आर, त्र्यंबकेश्‍वर-१४ हेक्टर ५० आर.

आपत्तीग्रस्त पिकांचे क्षेत्र

० कोरडवाहू मका-३ हेक्टर १० आर ० पपई-३ हेक्टर ८० आर

० कांदा-३५ हजार २१० हेक्टर २३ आर ० इतर फळपिके-९ हेक्टर ५५ आर

० कांदा रोपे-३० हेक्टर १२ आर ० वेलवर्गीय फळे-५४ हेक्टर ६९ आर

० मका-४६८ हेक्टर ५४ आर ० द्राक्षे-३ हजार ४१० हेक्टर २२ आर

० मिरची- ८ हेक्टर ७१ आर ० डाळिंब-१ हजार १२ हेक्टर ८१ आर

० गहू-३३४ हेक्टर ५३ आर ० लिंबू-१४ हेक्टर २८ आर

० टोमॅटो-८१ हेक्टर ११ आर ० पेरू-१० हेक्टर ५९ आर

० बाजरी-१४४ हेक्टर ८३ आर ० चिकू-५ हेक्टर ६४ आर

० भुईमूग-१७ हेक्टर ३२ आर ० मोसंबी-३ हेक्टर ६५ आर

० हरभरा-५ हेक्टर ९९ आर ० सीताफळ-

२ हेक्टर १० आर

० भाजीपाला-१ हजार ८८ हेक्टर ८४ आर ० आंबा-१ हजार २३८ हेक्टर ६३ आर

० ऊस-९ हेक्टर ४१ आर ० इतर फळपिके-१३ हेक्टर ४२ आर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT