सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील सरदवाडी येथील रहिवासी आणि शेतकऱ्यांच्या सोयीकामी राष्ट्रीय महामार्गाला समातंर सर्व्हिसरोड बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.
सरदवाडी परिसरात सर्व्हिसरोडच्या कामांसाठी कडून पाच कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्याने सरदवाडी येथील रहिवासी तसेच शेतकऱ्यांची कुचुंबना थांबणार असून आता लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. (5 Crore 61 Lakh Fund Sanctioned for Construction of Service Road Parallel to Highway in Saradwadi Area Nashik News)
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
सरदवाडी शिवारातून जाणाऱ्या नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत उंच डोंगर असून या ठिकाणी तटबंदी उभारण्यात आलेली आहे.त्यामुळे शरदवाडी येथील रहिवासी आणि शेतकऱ्यांना महामार्गावर प्रवेश करता येत नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सुरू होता.
सदर गैरसोय दूर होण्यासाठी या ठिकाणी महामार्गाला समांतर असा सर्व्हिसरोड बांधण्यात यावा अशी मागणी सरदवाडीच्या रहिवाशांकडून खा.गोडसे यांच्याकडे सतत होत होती. सर्व्हिसरोडच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे यांच्याकडून केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.
खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज रस्ते आणि वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने शरदवाडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला समांतर सर्व्हिस रोडच्या बांधकामासाठी पाच कोटी एकसष्ट्र लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्याने सरदवाडी येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.