Nashik News : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त जगभरात आनंदाला उधाण आले आहे.
त्याचे पडसाद गावागावात उमटले असून त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर येथील प्राचीन श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धारासह तळ्यातील भैरवनाथ महाराज व नागेश्वर मंदिर जिर्णोद्धाचा प्रारंभ आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) होत आहे. ()
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश वाजे, विठ्ठलराजे उगले, बाळासाहेब उगले, नामदेव लोंढे, अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड. शिवाजी देशमुख, अॅड. नामदेव हिरे, योगेश सातभाई, महंत भक्तीचरणदास महाराज, महंत रुक्मिणीबाई झुंबरदास बैरागी, महंत अभिमन्यू, नारायणदास वैष्णव, भाऊसाहेब देशमुख, वसंतराव निचळ यांच्यासह संत महंत उपस्थित राहणार आहे.
सिन्नर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून येथील मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. त्यात श्रीराम मंदिराचाही समावेश आहे. या प्राचीन मंदिराचा उल्लेख ताम्रपटात आढळतो.
या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंदिरास प्राप्त झाला असून अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच श्रीराम मंदिर जिर्णोद्धार व सुशोभीकरण कामास सोमवारी (ता. २२) दुपारी चारला आमदार कोकाटे यांच्या हस्ते प्रारंभ करणार असल्याचे मंदिराचे महंत दुर्गादास गुरु झुंबरदास बैरागी यांनी सांगितले.
या मंदिरांचा होणार जीर्णोद्धार
दरम्यान, येथील तळ्यातील भैरवनाथ मंदिरासाठी ३ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून या मंदिराच्या जिर्णोद्धारासह नागेश्वरी येथील मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन आमदार कोकाटे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्यास या सोहळ्यास भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिन्नर येथील प्रभु श्रीरामचंद्र, मंदिर जीर्णोद्धार समिती, बैरागी वैष्णव समाज, तळ्यातील भैरवनाथ महाराज पंच मंडळ कमिटी, मळहद्द मित्र मंडळ, मापारवाडी आदींसह राम भक्तांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.