drought sakal
नाशिक

Nashik Drought News : कृषी अर्थव्यवस्थेला 5 हजार 300 कोटींचा तडाखा; सण, उत्सवांवर दुष्काळाचे सावट

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik Drought News : अभूतपूर्व दुष्काळामुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचा अक्षरश: पालापाचोळा झाल्याने कृषी अर्थव्यवस्थेला पाच हजार ३०० कोटी रुपयांचा तडाखा बसला आहे.

त्याचा ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार असून, येणाऱ्या काळात सण, उत्सवांवरही दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे.

खरिपातील बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाल्यात जमा आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले. (5 thousand 300 crore loss to agricultural economy nashik news)

जून व जुलैमधील रिमझिम पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात ९२ टक्के पेरणी झाली. जिल्ह्यात बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, कपाशी, भात, ज्वारी, नागली, मूग, कारळे ही प्रमुख पिके घेतली जातात. ऑगस्टमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही.

त्यामुळे या पिकांची अक्षरश: धूळधाण झाली. त्यांनी जागेवरच मान टाकली असून, पेरणीचे अस्तित्वही शिल्लक राहिलेले नाही. अशा विदारक परिस्थितीत सलग २१ दिवस पाऊन न झालेल्या भागाचे कृषी विभाग व ओरिएन्टल पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले. ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे जिल्ह्यात कमीत कमी ६० टक्के व जास्तीत जास्त ९९ टक्के पिकांचे नुकसान झाले होते.

सर्वेक्षण होऊन १५ दिवस झाले अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा लाख ४१ हजार ३९५ हेक्टरवरील सर्वच पिकांना तडाखा बसला.

यात बाजरीचे एक लाख १३ हजार हेक्टर, मका दोन लाख १६ हजार हेक्टर, भुईमूग २५ हजार ९२६ हेक्टर, सोयाबीन ७५ हजार ५६२ हेक्टर व कपाशीच्या ४६ हजार हेक्टरचा समावेश होतो. जिल्ह्यात खरीप कांद्याची ६० हजार हेक्टरवर लागवड होते; पण यंदा लागवडच झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या गोष्टींवर होणार परिणाम

ग्रामीण अर्थव्यवस्था ही खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते. ऐन दिवाळी सणाच्या काळात कपाशी, मका व बाजरी ही पिके हाताशी आलेली असतात. या मालाच्या विक्रीतून शेतकरी नवीन कपडे, गाड्या, दागिने आदी खरेदी करतात. पण, यंदा त्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न लवकरच भेडसावेल.

पीकनिहाय झालेले नुकसान

भात- ७६६ कोटी

बाजरी- २२६ कोटी

ज्वारी- ८९ लाख

नागली- ७३४ कोटी

मका- दोन हजार तीन कोटी

तूर- २२० कोटी

मूग- ९८ कोटी

उडीद- २४ कोटी

भुईमूग- १०१ कोटी

कारळे- २१ कोटी

सोयाबीन- ५७७ कोटी

कपाशी- ७२४ कोटी

एकूण- ५ हजार २९७ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT