Winner esakal
नाशिक

5 वर्षीय कायराचा सात महिन्यात दोनदा वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रविवार कारंजा येथील कायरा मयूर बुरड, या पाचवर्षीय चिमुकलीने स्केटिंग प्रकारात गेल्या सात महिन्यांत दोनदा विश्व रेकॉर्ड केले. त्याचप्रमाणे तीन ग्लोबल रेकॉर्ड सह ३२ पदक प्राप्त केले. असे करून तिने केवळ शहर, कुटुंबीयांचे नाव उज्ज्वल केले असे नाही तर ‘हम किसी से कम नही’ वाक्यास साजेशी कामगिरी करून मुलीदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून दिले.

बेळगाव, कर्नाटक येथे ९६ तास रिले स्केटिंग आणि लॉन्गेस्ट सेंटेंस फॉर्मेशन अशा प्रकारांमध्ये यशस्वीरीत्या कामगिरी करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. दरम्यान, गोवा येथे झालेल्या ‘गोवा स्केटिंग फेस्टिवल ’ या राष्ट्रीय स्पर्धेत अंडर- ६ वयोगटात शॉर्ट रेस आणि लॉन्ग रेस मध्ये २ सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या यशस्वी कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय ओपन रोलर टूर्नामेंट, इंडोनेशियासाठी तिची निवड झाली आहे. स्पर्धेत ती देशाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती अमृता बुरड यांनी दिली. आज समाजात तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील वेगळी ओळख झाली आहे. तिच्या नावाने कुटुंबीय ओळखले जात आहे. एखाद्या पालकास त्याच्या पाल्याच्या नावाने ओळखले जाणे. त्या पालकांसाठी अभिमानाची बाब आहे. आज आम्हाला तोच अभिमान होत आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढेही तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिला रेकॉर्ड २६ जानेवारी २०२२ ला केला होता. त्यानंतर तिने मागे न वळता विविध स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. प्रशिक्षक विजय मल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कायराने ७ महिन्याच्या कालावधीत २ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, ३ ग्लोबल रेकॉर्ड करून राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर ११ सुवर्ण, ८ रौप्य, ७ कास्य तसेच ६ इतर पदके असे एकूण ३२ पदकांची कमाई केली.

''आगामी काळात खेळ प्रकारात ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व करण्यासह जास्तीत- जास्त पदकांची कमाई करून पंतप्रधानांची भेट घेण्याची इच्छा आहे.'' - कायरा बुरड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT