Samruddhi Mahamarg News, Samruddhi Mahamarg benefits esakal
नाशिक

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ मुळे 50 कोटींच्या इंधनाची बचत

अजित देसाई

सिन्नर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवडाभरापूर्वी लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावरून साठ हजार वाहने धावल्याचे रस्ते विकास महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. नागपूर-शिर्डीदरम्यान, जालना, औरंगाबाद व शिर्डीपर्यंत थेट येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

‘समृद्धी’मुळे शंभर किलोमीटर अंतर कमी झाल्याने सुमारे ५० कोटी रुपयांच्या इंधनाची आठवड्यात बचत झाली. शिवाय औरंगाबाद, शिर्डीपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत सहा तासांची बचत झाली आहे. तसेच पथकराचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. (50 crore fuel Savings due to Samruddhi expressway)

समृद्धी महामार्गाचे मुंबई ते नागपूर अंतर ७१० किलोमीटर असून, त्यापैकी ५७० किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. ‘समृद्धी’चे लोकार्पण झाल्यानंतर त्याचदिवशी दुपारी तीननंतर महामार्गावरून वाहनांची ये-जा सुरू झाली.

आठवडाभरात बहुतांश वाहने शिर्डी, औरंगाबाद व जालनापर्यंत धावली. औरंगाबाद, जालना येथूनही अंतर शंभर किलोमीटरने कमी झाले. दिवसाला सव्वासहा हजार वाहने नागपूर ते औरंगाबाद, शिर्डीदरम्यान धावली, असे महामंडळाच्या आकडेवारीतून दिसते. शंभर किलोमीटरच्या कमी झालेल्या अंतरानुसार दिवसाला सर्वसाधारणपणे सव्वासहा कोटींचे इंधन वाचले आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

शिर्डी ते नागपूरदरम्यानच्या पूर्वीच्या प्रवासाला बारा तास लागायचे. ही वेळ ‘समृद्धी’मुळे आता सहा तासांवर आली आहे. आठवड्यात धावलेल्या वाहनांची संख्या आणि प्रत्येक वाहनामागे पाच प्रवासी असे गृहीत धरल्यास रोज एक लाख ८७ हजार ५० तास व आठवडाभरात चौदांहून अधिक तासांचा वेळ वाचल्याचे दिसते. समृद्धी महामार्गावरून जाण्यासाठी शिर्डी ते नागपूर या टप्प्यातील अंतरात ‘लाइट वेट’ आणि कार प्रकारातील वाहनासाठी एकेरी प्रवासासाठी जवळपास ९०० रुपये टोल द्यावा लागणार आहे. मुंबईपर्यंत थेट प्रवास करायचा झालास ही रक्कम बाराशे रुपये होते.

"रस्तेविकास महामंडळाने ठरवून दिलेल्या वेगमर्यादेनुसार वाहने चालवणे आवश्यक आहे. त्यातून वाहनास सरासरी ‘ॲव्हरेज’ मिळेल; अन्यथा अधिकचे इंधन लागेल. वेगमर्यादा न पाळल्याने वाहनांचा ‘मेंटेनन्स’ खर्च वाढेल. प्रवासास निघताना वाहनांची टायर तपासणी आवश्यक आहे. शंभर किलोमीटरला दहा मिनिटांची विश्रांती घ्यावी. अधिक वेगात वाहन चालवल्याने इंजिन गरम होऊन वाहन पेटू शकते. अथवा टायर फुटून अपघात होऊ शकतो. समृद्धी महामार्ग अजून अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी बंदिस्त झालेला नाही. त्यामुळे रस्त्यावर जनावरे येऊन अपघाताना निमंत्रण देतील."

- राजेंद्र साठे (वैजापूर-औरंगाबादचे गॅरेज व्यावसायिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT