चिचोंडी (जि.नाशिक) : महालखेडा (ता. येवला) येथील विठ्ठल भिकाजी सानप यांच्या येवला शाखेच्या ॲक्सिस बँकेच्या (axis bank) खात्यातून एटीएमद्वारे (ATM) पन्नास हजार रुपये काढले गेल्याने त्यांनी सायबर पोलिसात (cyber police) तक्रार दाखल केली आहे. नेमका प्रकार काय?
नेमका प्रकार काय?
विठ्ठल सानप यांचे ॲक्सिस बँकेच्या येवला शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या या खात्यातून ५ नोव्हेंबर २०२० ला तीनदा एटीएमच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये काढले गेल्याचे मेसेज त्यांना प्राप्त झाले. त्यांनी बँकेशी संपर्क करत व कस्टमर केअरला कॉल करून सांगितले, मात्र बँकेने त्यांना उलट प्रश्न विचारून त्रास दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कस्टमर केअरला फोन केला असता पोलिसात तक्रार करू नका असे म्हटले. बँकेत गेल्यावर पोलिस तक्रार केली का ? असा उलटपक्षी प्रश्न विचारला. तुमचे पैसे येतील असे त्यांना सांगण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत एटीएमच्या माध्यमातून गेलेले ५० हजार रुपये सानप यांना मिळाले नसल्याने त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
चाकणमधून हेराफेरी
खात्याचे स्टेटमेंट काढले असता ही रक्कम चाकण (जि.पुणे) येथील एटीएममधून काढले गेल्याचे बँक इन्ट्रीत दिसत आहे. आपण शेतकरी असून गहाळ झालेले पैसे मिळतील या आशेवर मी थांबलो, मात्र अद्याप पैसे न मिळाल्याने ते मिळावेत अशी मागणी तक्रारअर्जाद्वारे सानप यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.