ZP schools in without light sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यातील ५४५ शाळा अंधारात

बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्याच्या कितीही बाता मारल्या जात असल्या तरी जोपर्यंत शाळांमध्ये पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने पुरविल्या जात नाहीत, तोपर्यंत गुणवत्तेवर न बोललेलेचं बरे अशी परिस्थिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची झाली आहे. या परिस्थितीला कारण म्हणजे तब्बल ५४५ शाळांकडे वीज बिल भरण्यासाठी पैसेचं नसल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्राथमिक विभागाकडून सौर उर्जेसह अन्य पर्याय शोधताना शासनाकडे धाव घेण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात त्यात किती यश मिळते हे काळचं ठरवेलं परंतु या निमित्ताने शाळा व विद्यार्थ्यांची हेळसांड समोर आली आहे.

शहरी भागातील महापालिका तसेच खासगी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविल्या जातात. महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा नसल्यास पालक, स्थानिक नगरसेवक देखील तितकेचं सतर्क असतात. त्यामुळे महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविण्यात कसर सोडली जात नाही. याउलट सीसीटिव्ही कॅमेर, शौचालय, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन, टॅबद्वारे शिक्षण या प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. खासगी शाळांमध्ये तर पायाभूत सुविधांच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते. व पालक देखील चांगल्या सुविधा मिळतं असल्याने स्वखुशीने देतात. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. शासनाच्या म्हणजेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर विद्यार्थ्याचे शिक्षण अवलंबून असते. तालुका पातळीवर आता चांगल्या शाळा असल्या तरी गावपातळीवर मात्र अद्यापही जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षण अवलंबून आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे प्रगतशील असला पाहिजे. शहरी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकला पाहिजे, अशा बाता मारल्या जातात परंतु विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. याच अनुषंगाने आढावा घेतला असता जिल्ह्यातील तब्बल ५४५ शाळांमध्ये वीज बिल न भरल्याने पुरवठा खंडित करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने देखील यास दुजोरा दिला आहे. शाळांची पाहणी करून शासनामार्फत महावितरण कंपनीकडे एकाचं वेळी देणी देवून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी माहिती दिली.

२०५ शाळा अद्यापही अंधारात

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या एकूण शाळांपैकी ५४५ शाळांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परंतु काही शाळा अशा आहेत की तेथे अद्यापपर्यंत वीजचं पोहोचलेली नाही अशा शाळांची संख्या २०५ असून या शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

५४५ शाळांपैकी किती ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे. याची माहिती घेत आहोत. वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळांची माहिती शासनाला पाठविली आहे. मागील वर्षी काही शाळांची देयके सरकारने अदा केली आहे. ज्या शाळांमध्ये वीज पोहोचली नाही तेथे सोलरचा प्रस्ताव दिला जाणार आहे.

- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

शाळांची स्थिती

३२६५

एकूण शाळा

५४५

वीजपुरवठा खंडित असलेल्या शाळा

२०५

शाळांना अद्यापही वीजपुरवठा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT