Nashik News : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच, आगामी सण-उत्सवांना गुन्हेगारांमुळे गालबोट लागू नये यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या ५५२ गुन्हेगारांना पोलिस ठाणेनिहाय हजेरी बंधनकारक करण्यात आलेले आहे.
दरम्यान, दोन वा त्यापेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांचा आदानप्रदान मेळावा घेण्यात आला. यात गुन्हेगारांची ओळखपरेड करण्यात येऊन त्यांना वर्तणूक सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या. (552 criminals have been made compulsory to appear at police station by police nashik news)
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारांनी डोके वर काढले होते. दिवसाढवळ्या व भरवस्तीमध्ये गोळीबाराच्या घटनांनी शहर पोलीसांवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
मोका, एमपीडीए, तडीपार, स्थानबद्धतेच्या कारवाया सुरू असतानाच आता, सराईत गुन्हेगारांची नव्याने माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून परत आलेल्या सराईत गुन्हेगारांचीही माहिती शहर पोलिसांनी घेतली.
या गुन्हेगारांना आता पोलिस ठाणे निहाय हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा नोटिसाच या गुन्हेगारांना बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारांची रोजच पोलिस ठाण्यामध्ये फेऱ्या वाढणार आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ठाणेनिहाय गुन्हेगारांची हजेरी
पंचवटी : ५५, म्हसरुळ : ६१, आडगाव : १८, भद्रकाली :०५, मुंबई नाका : ५०, सरकारवाडा : ११, गंगापूर : १३, सातपूर : २६, अंबड :०९, एमआयडीसी चुंचाळे : १०, इंदिरानगर : १२, नाशिकरोड : १९७, उपनगर : ६१, देवळाली कॅम्प : २४. एकूण : ५५२
गुन्हेगारांना ताकीद
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार मुख्यालयाच्या भीष्मराज सभागृहात सराईत गुन्हेगारांचा आदान-प्रदान मेळावा घेण्यात आला. या वेळी शहरातील १३४ सराईत गुन्हेगारांना हजर करण्यात आले.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांना ताकीद देतानाच हातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही याबाबत सूचना करतानाच घडल्यास प्रतिबंधात्मक कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण यांनी दिले. या वेळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारीही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.