NMC News  esakal
नाशिक

NMC News : मनपाचा कामकाजाचा गाडा खोलात रुतणार; 58 अधिकारी, कर्मचारी होणार निवृत्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना आता पुन्हा या वर्षी अधीक्षक अभियंत्यांसह ५८ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार असल्याने महापालिकेच्या कामकाजाचा गाडा अधिक खोलात रुतणार आहे.

महापालिकेचा पहिला आकृतिबंध ७०८२ पदांचा मंजूर झाला होता. त्यापैकी आता जवळपास साडेचार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. (58 officers and employees including superintendent engineer will retire from nmc nashik news)

रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने बंधने घालून दिली आहे. त्यात 35 टक्क्यांच्या वर आस्थापना खर्च जाऊ नये, अशी प्रमुख अट आहे. परंतु नाशिक महापालिकेने सातवा वेतन आयोग फरकासह देण्याचा निर्णय घेतल्याने महसुली खर्च ४५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यात आता टीसीएसमार्फत आरोग्य व अग्निशमन दलातील ७०६ पदे भरली जाणार आहे.

त्या व्यतिरिक्त महापालिकेने शहरी आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथेही एक एमबीबीएस डॉक्टर व अन्य स्टाफ भरावा लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तोदेखील खर्च वाढणार आहे. त्यामुळे ३५ टक्क्यांच्या आत महसुली खर्च कदापिही शक्य नाही. त्यामुळे महापालिकेच्या रिक्त पदांच्या भरतीवर फुली लागली आहे.

आता यापुढे जे काम होतील, ते आउटसोर्सिंगच्या माध्यमातूनच होतील. दरम्यान, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे वाढत असताना या वर्षी ५८ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होणार असून, सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात वाढ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT