Ayushman Bharat E Card esakal
नाशिक

Ayushman Bharat E Card : आयुष्यमान ई कार्ड वाटपात नाशिक राज्यात अव्वल! असे काढा इ कार्ड

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय (Medical) उपचार मिळावे या करिता जिल्ह्यातील एकूण १६ लाख १२ हजार १७४ लाभार्थ्यांपैकी ६ लाख ५२ हजार ६२४ (४१ टक्के) लाभार्थींनी ई- कार्ड काढले आहे. (6 lakh 52 thousand 624 beneficiaries of district have drawn cards to get free medical treatment under Ayushman Bharat Yojana nashik news)

राज्यात सर्वाधिक आयुष्यमान कार्ड वाटप करून नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. नाशिक पाठोपाठ दुसऱ्यास्थानी जळगाव (४ लाख ७० हजार १८६), तिसऱ्यास्थानी पालघर (३ लाख ८९ हजार ९५०), चौथ्या क्रमांकावर यवतमाळ (३ लाख ८६ हजार ६१५) तर पाचव्या क्रमांकावर पुणे (३ लाख ८० हजार १९३) जिल्हा आहे.

गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, या करिता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत योजना) राबविली जात असून, वर्षाला एक लाखापर्यंत उत्पन्न असल्यास १२०९ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.

सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जनआरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी १६ लाख १२ हजार १७४ लाभार्थी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ६२४ लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे ई- कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

अद्यापही ९ लाख ६१ हजार ८७७ लाभार्थींनी ई- कार्ड काढलेले नाहीत. जिल्हाभरातील दोन हजारहून अधिक सीएससी केंद्र आणि एक हजार आपले सरकार सेवा केंद्रातून हे ई- कार्ड/गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाला शिधापत्रिकेवरून निवडक गंभीर १२०९ आजारांवर शस्त्रक्रिया, उपचारांची सुविधा नोंदणीकृत खासगी व सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध आहे.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीला पाच लाख रुपयांचे विमा कवच असून, देशभरात अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील ६९ रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असून यामध्ये ८ शासकीय तर, ४६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ज्या लाभार्थ्यांनी कार्ड काढलेले नसेल त्यांनी तत्काळ जवळच्या केंद्रावर जाऊन हे कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे यांनी केले आहे.

ई- कार्ड काढण्यासाठी काय कराल?

ई- कार्ड काढण्यासाठी आयुष्यमान भारत पत्र, रेशनकार्ड व आधारकार्ड हे कागदपत्रे घेऊन सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे. स्वतःच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला द्यावा. म्हणजेच ई- कार्ड त्वरित तयार होऊन उपलब्ध होईल.

आयुष्यमान ई- कार्ड कोणाला काढता येणार?

गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्डनुसार
जिल्ह्यात १६ लाख १२ हजार १७४ लाभार्थी आहेत.

"आतापर्यंत ६ लाख ५० हजार २९७ लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे ई- कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे. लाभार्थ्यांना आपले सरकार केंद्र किंवा सीएससी सेंटरवरूनदेखील ई- कार्ड मोफत काढून घेता येईल. कार्ड काढून घेण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर मोहीम राबविण्यात आली होती. केंद्रावर आरोग्य मित्र कार्यान्वित असून त्यांच्याशी संपर्क केल्यास कार्ड काढून मिळतील." - डॉ. हर्षल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

तालुकानिहाय काढण्यात आलेले कार्ड

तालुका एकूण लाभार्थी कार्ड काढलेले लाभार्थी टक्केवारी

मनपा क्षेत्र ३२८५५७ ८३७२३ २५ मालेगाव मनपा क्षेत्र १२७१८१ २८०९५

बागलाण १०६०८० ४३६९७ ४० चांदवड ५०२०८ २६८४७ ५३

देवळा ३१३७९ १९०७१ ६१ दिंडोरी ९७६६४ ५४६७१ ५६

इगतपुरी ७४४६७ ३२०९१ ४३ कळवण ७६०४२ ३९९४० ५३

मालेगाव ११००४५ २८९८४ २६ नांदगाव ७७२४८ २८५९२ ३७

नाशिक ४५२५८ २९१५४ ६४ निफाड ९८२५१ ५०९९५ ५२

पेठ ७०४५८ ३६५८२ ५२ सिन्नर ७०११६ ३१८५४ ४५

सुरगाणा ११०५५० ५६५३१ ५१ त्र्यंबकेश्वर ७७६०३ ३३५६० ४३

येवला ६१०२७ २७९१० ४६ एकूण १६१२१७४ ६५२६२४ ४१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT