gharkul yojana esakal
नाशिक

Nashik News: 6 हजार कुटुंबे घरकुलापासून वंचित! पिंपळगाव शहरातील झोपडपट्टी ठरतेय कळीचा मुद्दा

एस. डी. आहिरे

Nashik News : व्यापार, उद्योग व रोजगारामुळे पिंपळगाव बसवंत शहराचा विस्तार बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे.

लाखभराच्या जवळपास द्राक्षनगरीची लोकसंख्या पोचेल. पिंपळगाव शहराच्या कक्षा वृंदावत असताना झोपडपट्टी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. (6 thousand families deprived of shelter slums in Pimpalgaon city are becoming key issue Nashik News)

पिंपळगाव शहरात सध्या नऊ झोपडपट्ट्या असून, त्यात सहा हजार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. भीषण वास्तव म्हणजे यातील तीन हजार झोपड्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंदच नाही.

त्या अनधिकृत आहेत आणि ज्यांची ग्रामपंचायतीकडे नोंद आहे, तेथे शासनाच्या घरकुल योजना नैवेद्य ठेवण्यापुरतीच पोचली. त्यामुळे अनधिकृत झोपडपट्ट्यांमुळे शहराचे विद्रूपिकरण थांबविण्याबरोबरच आहे तेथे घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

पिंपळगाव बसवंतमध्ये होत असलेल्या व्यापार उदिमातून मिळणारा रोजगार, निफाड, चांदवड, दिंडोरी, अशा तीन तालुक्यांच्या कनेक्टिव्हिटीसह महामार्गावरील शहर असल्याने इच्छितस्थळी लवकर पोचता येते.

यातूनच पिंपळगावच्या विस्ताराचा वेग १५ वर्षांत दुपटीने वाढला आहे. येथील सदनिकांचे दर नाशिकच्या तोडीचे आहेत. घराची किंमत कष्टकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने उपनगरामध्ये नागरिकरण वाढले.

तसे झोपडपट्ट्यांचा विळखाही घट्ट झाला आहे. झाले तेवढे पुरे आता अनधिकृत झोपडपट्ट्यांवर ग्रामपंचायतीने करडी नजर ठेवायला हवी; अन्यथा निवडणुकीत मते मिळविण्याच्या लोभात शहराच्या नियोजनबद्ध विकासाला हरताळ फासले जाऊ शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नऊ झोपडपट्ट्यांमध्ये अवघी दोनशे घरकुले

शासन स्तरावरून घरकुल योजनेचे ढोल वाजविले जातात. प्रत्यक्षात योजना सामान्यांपर्यंत पोचत नसल्याचे स्पष्ट होते. घरकुल योजनेच्या नावाखाली पुनर्वसन म्हणजे कष्टकऱ्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरेल.

पिंपळगाव शहरात सिद्धार्थनगर, भाऊनगर, हनुमाननगर, शास्त्रीनगर, महादेववाडी, अंबिकानगर, अचानकनगर, वीटभट्टी, निफाड फाट्यावरील वाल्मीक ऋषीनगर, अशा नऊ झोपडपट्ट्या आहेत.

त्यात सुमारे सहा हजार घरे असून, त्यांची लोकसंख्या ३० हजारांच्या जवळपास आहे. सहा हजारांपैकी तीन हजार घरांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे, तर उर्वरित अनधिकृत आहेत.

ग्रामपंचायतीत नोंद असलेल्या तीन हजार कुटुंबांनी इंदिरा आवास, राजीव आवास, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केले. दहा वर्षांत अवघ्या २०० कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ मिळाला.

त्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेचा संथ प्रवास पाहता झोपडपट्टीत टुमदार घरे असणे कष्टकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. येथील काही कष्टकरी कुटुंबांनी शासनाच्या घरकुलांची प्रतीक्षा न करता स्वकमाईतून पक्की घरे बांधली आहेत.

"घरकुल योजनेचा मोठा गाजावाजा केला जातो; पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना गोरगरिबांची चिरीमिरीसाठी अडवणूक केली जाते. त्यामुळे पिंपळगाव शहरात घरकुल योजनेचे अस्तित्व दिसत नाही." - दीपक मोरे, माजी सदस्य, ग्रामपंचायत, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT