NMC Garbage Truck esakal
नाशिक

Sakal Exclusive : शहरात भाजीपाला, कपड्यांचा कचरा अधिक; ओला 60, तर कोरडा कचऱ्याचे 40 टक्के संकलन

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : महापालिका हद्दीतून ओला व सुका असे वर्गीकरण करून कचरा गोळा केला जातो. जवळपास आठशे मेट्रीक टन कचरा दररोज घंटागाड्यांच्या माध्यमातून घराघरांतून उचलला जातो. एकूण कचऱ्यापैकी साठ टक्के ओला, तर चाळीस टक्के सुका कचरा संकलित केला जातो.

खत प्रकल्पावर संकलित होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करता हरित भाजीपाला व कपड्यांचा कचरा अधिक बाहेर पडत असून, प्रतिघर सरासरी सहाशे ग्रॅम कचरा बाहेर पडत असल्याचे दिसून येते. राज्यात नाशिक महापालिका हद्दीमध्ये कचरा घंटागाडी उपक्रम प्रथम सुरू झाला. १९९६ मध्ये प्रथम घंटागाडी सुरू झाली, तेव्हा ४० वाहने होती.

त्यातून १०० मेट्रीक टन कचरा संकलित केला जात होता. शहरात सहा विभागांमध्ये एकूण ३१६ घंटागाडी चालतात. त्यातील घराघरांतून कचरा संकलन करण्यासाठी २३२ घंटागाड्या चालविल्या जातात. (60 percent of wet and 40 percent of dry waste is collected by garbage van nashik news)

सध्या हाच कचरा जवळपास ८०० मेट्रीक टन संकलित होतो. शहर वाढत आहे. त्याप्रमाणे मिळकती व कचरादेखील वाढतं आहे. सद्यःस्थितीत पाच लाख तीस हजार मिळकती आहे. सरासरी ८०० मेट्रीक टन कचरा संकलनाचा विचार करता जवळपास ६०० ग्रॅम कचरा प्रत्येक घरातून संकलित होतो.

कचरा संकलित करताना रोजच्या वापरातील ओला व सुका कचरा अपेक्षित आहे. परंतु प्लास्टिक, कपडे याचाच कचरा अधिक प्रमाणात संकलित होत आहे. ओल्या कचऱ्यामध्ये हरित भाजीपाल्याचा कचरा जवळपास निम्मा म्हणजे ५० टक्के आहे. सुका कचऱ्यामध्ये कपड्यांचा कचरा हा १९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यापाठोपाठ प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण जवळपास ७.६४ टक्के आहे. कारबोर्ड व इतर उत्पादनांचा कचरादेखील चार टक्के संकलित होतो.

कचरा वर्गीकरण (कंसात टक्केवारी)

ओला कचरा

- हरित भाजीपाला- ५०.६४

- टाकाऊ अन्न- ५.५९

- मास- १.०१

- नारळ व फळांच्या साल- ०.९९

- कागद व कागद समान वस्तु- २.६५

एकूण- ६०.८८

सुका कचरा

- प्लास्टिक - ७.६४

- कपडे - १९.५५

- वाळू व माती- ०.३१

- काच व काचेचे भांडे- ०.७१

- स्टील, अॅल्युमिनिअम, टिन, कॉपर- ०.३२

- रबर, टायर, ट्युब- २.३२

- सिंथेटिक लेदर- १.५८

- कारबोर्ड व इतर उत्पादन- ४.०३

- गन्नी बॅग्ज- २.४१

- थर्माकोल- ०.१६

- खेळणी- ०.०९

एकूण- ३९.१२

विभागनिहाय घंटागाडीमार्फत घरोघरी कचरा संकलन

विभाग कचरा संकलन (मेट्रीक टन)

पूर्व १४१.४८०

पश्चिम ८३.५३५

नाशिक रोड १०६.८६५

पंचवटी- १६३.१८०

सिडको- १६७.३४०

सातपूर- ११८.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT