600 active Corona patients in nashik district esakal
नाशिक

Corona ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या सहाशेपार | Nashik

नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहते आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहते आहे. यामुळे सक्रिय रुग्‍ण संख्येत सातत्‍याने वाढ होत आहे. बुधवारी (ता.१३) जिल्ह्यात ७९ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह तर १९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून सक्रिय रुग्‍णसंख्येत साठने वाढ झाली असून, ही संख्या सहाशेपार पोचली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ६१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (Nashik Corona Updates)

एकीकडे नव्‍याने आढळणारे कोरोना बाधित आढळत असताना दुसरीकडे कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या तुलनेत कमी राहत आहे. बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ५६, नाशिक ग्रामीणमध्ये ऐकोणावीस रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आलेत. जिल्‍हा बाहेरील चौघांना कोरोनाची लागण झाली. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. (Latest Marathi News)

सध्या उपचार घेत असलेल्‍या ६१७ बाधितांपैकी सर्वाधिक ३०१ बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील २४५, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ४१, जिल्‍हा बाहेरील तीस बाधितांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत वाढ झाली असून सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ३७९ अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक एक हजार १०१, नाशिक शहरातील १३४, मालेगावच्‍या १४४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. बुधवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर ३.४९ टक्‍के राहिला. नाशिक महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्‍हीटी दर सात टक्‍के नोंदविला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: राज्यात 38 जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त; मतदारसंघात भाजपचीच सरशी, विक्रमी जागा जिंकल्या

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

SCROLL FOR NEXT