mare worth Rs 61 lakh has come up for sale in the market & other horses for sale esakal
नाशिक

Horse Market : 61 लाखांच्या घोडीने वेधले लक्ष; लाखोंची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : हौसेला मोल नसते म्हणूनच कितीही लाख किंमत असली तरी देखण्या, ऐटबाज अन् ताकदवान घोडे खरेदी करणाऱ्यांची आणि सांभाळणाऱ्यांची संख्या देशभरात कमी नाही, याचा प्रत्यय आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाऱ्या देशात लोकप्रिय असलेल्या घोडेबाजारातून आला. येथे विक्रीसाठी उदयपूरच्या राजेशाही वंशाच्या ६१ लाखांच्या किमतीच्या घोडीने बाजारात लक्ष वेधले. (61 lakh horse attracted attention Millions of turnover in horse market yeola Nashik Latest Marathi News)

येवल्याचा घोडेबाजार हा इतिहासकालीन असून, सुमारे ४०० वर्षांपूर्वी शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे यांनी शहर बसवल्यानंतर या घोडेबाजाराला सुरवात केली होती. तेव्हापासूनचा हा घोडेबाजार महाराष्ट्रसह देशभरात प्रसिद्ध झाला आहे. मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भरणारा येथील घोडेबाजार हा वर्षभर अगदी अव्याहतपणे चालत असतो, ही मोठी खासियत आहे. त्यातही दसरा सणाच्या अगोदरच्या मंगळवारी येथे देशव्यापी घोडाबाजार भरतो.

एरवी आठवडेबाजारात जवळपास १०० च्या आसपास घोडे दाखल होत असतात. मात्र, आजच्या दसऱ्याच्या अगोदरच्या खास घोडा बाजारात ६०० ते ७०० घोडे दाखल झाले होते. त्यामुळे व्यापारी व शौकिनांच्या गर्दीने आवार फुलून गेले होते. पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व देशाच्या कानाकोपऱ्यातून घोड्याचे व्यापारी व खरेदीदार आले होते. बाजारात पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा अशा अनेक गुणांचे घोडे आलेले होते. १५ हजारांपासून ते ६१ लाखापर्यंतच्या घोडे विक्रीला आले असल्याचे सचिव कैलास व्यापारे यांनी सांगितले.

आजच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे उदयपूरच्या राजेशाही घराण्यातील वापरलेल्या घोड्यांचा वंश असलेल्या एका घोडीची किंमत तब्बल ६१ लाखांपर्यंत लावण्यात आली असल्याची माहिती या घोडीच्या मालकाने दिली आहे. लाखाच्या आसपास किमतीच्या १०० वर घोड्यांची खरेदी-विक्री झाली. यापूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेता- निर्माता महेश मांजरेकर यांनी देखील येथील बाजारातून ऐटबाज घोडा खरेदी केला होता.

"शहराच्या स्थापनेपासून येथे घोडेबाजार भरतो. दसऱ्याच्या आदल्या मंगळवारी ४०० हून अधिक वर्षांपूर्वी आमचे राजे रघुजीबाबा शिंदे या पूर्वजांनी सुरू केलेल्या या बाजाराचे महत्त्व व क्रेज वाढत आहेत. आज देशभरातून व्यापारी आले होते. या ऐतिहासिक घोडेबाजाराला शासनाने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात त्याची माहिती अश्वप्रेमीपर्यंत पोचविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे." - ॲड. शाहूराजे शिंदे, अश्वप्रेमी, येवला

"येथील बाजारात प्रत्येक मंगळवारी घोडेबाजार भरतो, तर दसऱ्याच्या आदल्या मंगळवारी भरणारा बाजार हा देशव्यापी असतो. आज देशभरातून येथे घोडे व्यापारी व प्रेमी खरेदी-विक्रीला आले होते. आज ७०० च्या आसपास घोडे विक्रीला आले होते. आज विक्रमी गर्दी बाजारात झाली होती. या माध्यमातून बाजार समितीला मोठे उत्पन्नही वर्षभर मिळत असते."

-कैलास व्यापारे, सचिव, बाजार समिती येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT