Citizens preferred to travel by ST bus during Diwali. esakal
नाशिक

Nashik : पिंपळगावला आगारावर दिवाळी प्रसन्न!; लालपरी 10 दिवसात मालामाल

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : एसटी महामंडळाची यावर्षीची दिवाळी, भाऊबिज आनंदात साजरी झाली. काही काळ आर्थिक अडचणीत आलेल्या लालपरीला दिपावली व भाऊबिज सणाने मदतीचा हात भार लावला आहे. ऐरवी दिवसाठी चार लाख रूपये उत्पन्न असलेल्या पिंपळगाव बसवंत आगाराच्या तिजोरीत दिपावलीच्या कालावधीत ७ लाख रूपयांपर्यत उत्पन्न जमा झाले.

मुलाबाळांना घेऊन सासरी गेलेल्या व त्यांना घेण्यासाठी गेलेल्या जावयांनी एसटी बसने प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे दिवाळीच्या दहा दिवसात तब्बल ६८ लाख रूपयांची कमाई पिंपळगाव आगाराला झाली आहे. (68 lakh rupees income in ten days during Diwali to MSRTC Nashik Latest Marathi News)

गेली काही वर्षे एसटी महामंडळ अनेक कारणांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनही महागाईच्या दृष्टीने कमी आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. संपामुळे जवळजवळ सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती.

त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळा बसला. दरम्यान, शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करीत काही मागण्यांच्या पूर्ततेची आश्‍वासने दिल्याने एसटी पुन्हा रूळावर आली. मात्र एसटी महामंडळापुढील अडचणी अद्याप संपलेल्या नाही.

अडखळत वाटचाल करणाऱ्या एसटीला दिपावली व भाऊबीज या सणांनी मात्र चांगलाच आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे. दीपावली निमित्ताने व शैक्षणिक सुटी असल्याने सर्वस्तरांतील प्रवाशांचा ओघ एसटीच्या प्रवासाकडे वाढला.

पिंपळगाव बसवंत आगाराचे दररोजचे सरासरी उत्पन्न चार लाख रूपयांपर्यत आहे, ते या काळात दीड पटीपेक्षा अधिक वाढून सात लाख रूपयांवर गेले. दहा दिवसात दररोज २२५ फेऱ्या व १५ हजार ५०० किमी अंतर पिंपळगांवच्या आगारातील बस धावल्या. एक लाख प्रवाशांची वाहतूक दिवाळीच्या कालावधीत झाली.

"सर्व स्तरांतील प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दिली आहे. दीपावलीच्या कालावधीत पिंपळगाव आगारातून दररोज सुमारे दहा हजार प्रवाशी एसटीतून प्रवास करीत आहेत. उत्पन्नात दीडपटीपेक्षा अधिक वाढ होऊन दहा दिवसात ६८ लाख रूपये मिळाले."

- व्ही. व्ही. निकम, आगार व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT