NMC News : आसारामबापू पुलाला लागून असलेला पूररेषेतील रस्ता भविष्यात वाहून जाणार आहे. हे ज्ञात असूनदेखील शहराच्या मुख्य भागातील रस्ते दुरुस्ती सोडून महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीसाठी सात कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने सादर केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले असून, रहदारीच्या पेठ रोड दुरुस्तीसाठी महापालिकेकडे पैसे नाहीत.
मात्र दुसरीकडे मोठे बिल्डर व मोठ्या हॉटेलची रेलचेल असलेल्या रस्त्यांसाठी होणारा सात कोटी रुपयांचा खर्च मात्र वादात सापडला आहे. (negligence to common people red carpet for wealthy rich 7 crores for road in use of rich nashik NMC construction department News)
नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने महापालिकेच्या कामकाजावर कोणाचेही नियंत्रण नाही. सध्या तर महापालिकेचा ५० टक्क्यांहून अधिक कारभार प्रभारींच्या हाती आहे. परंतु त्यांना महापालिकेच्या कामकाजाविषयी काहीही देणेघेणे नाही.
महापालिकेत तीन नवीन उपायुक्त आले आहेत. मात्र कामकाजाची माहिती घेत असल्याच्या सबबीखाली कुठलीही जबाबदारी घेण्यास त्यांची तयारी नाही, असे असताना ‘रामभरोसे’ कारभार चाललेल्या महापालिकेत बांधकाम विभागाने हात धुवून घेण्याचा नवीन फंडा आणला आहे.
आसारामबापू पूल ते फॉरेस्ट नर्सरी हा गोदावरी नदीला असलेला समांतर रस्ता पंचवटी विभागातील मखमलाबाद शिवारातील सर्वे क्रमांक १५१ ते १४१ यादरम्यान येतो. १८ मीटर रुंदीचा हा रस्ता २००७ मध्ये वादग्रस्त ठरला होता.
जिथे जनावरे जात नव्हते, तेथे महापालिकेने स्वखर्चाने ५० कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला. तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या कार्यकाळात झालेला हा रस्ता त्या वेळी वादात सापडला होता. सद्यःस्थितीत या भागात मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प सुरू आहेत.
त्याचबरोबर नवीन हॉटेल येथे तयार होत असल्याने रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गंगापूर रोड परिसरातून मखमलाबाद, पेठ रोड, दिंडोरी रोड व पंचवटी भागात गोदावरी नदी ओलांडून जाण्यासाठी महत्त्वपूर्ण रहदारीचा रस्ता असल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात तिथे श्रीमंतांचा अधिक वावर असतो.
त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाला संबंधित रस्ता तयार करण्याची मोठी घाई झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. जेथे रस्त्याची कामे सुरू आहे, तेथेही अनियमितता दिसून येत आहे.
रहदारीच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. असे असताना या रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे सोडून बांधकाम विभागाला या रस्त्यांची काळजी वाटू लागली आहे.
त्यामुळे सहा कोटी ९९ लाख ६४ हजार १५१ रुपये रस्ता दुरुस्तीसाठी खर्च करण्यास मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याकडून अतिरिक्त आयुक्त शहर व त्यांच्याकडून महासभेवर सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निधीबाबत महापालिकेच्या दोन तऱ्हा
पेठ रोडवरील हॉटेल राऊ ते महापालिका दरम्यान जवळपास चार ते साडेचार किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने निधी नसल्याचे कारण देत हात वर केले होते. स्मार्टसिटी कंपनीकडून निधी मागण्यात आला.
मात्र स्मार्टसिटी कंपनीनेही नकार दिला. अखेरीस आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
संबंधित रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसताना आता श्रीमंतांची वसाहत असलेल्या या रस्त्याची काळजी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. जेथे खर्च करायचा तेथे होत नाही. मात्र आवश्यकता नसतानाही होत असलेला खर्च महापालिकेची तिजोरी रिकामी करणारा ठरत आहे.
निधीची तरतूद नाही; मात्र पर्याय
गोदावरी नदीच्या पूररेषेमध्ये संबंधित रस्ता आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर येऊन रस्ता वाहून जाणार आहे, असे असतानादेखील जवळपास
सात कोटी रुपये खर्चाची मागणी बांधकाम विभागाने केली आहे. दुसरीकडे २०२३ व २४ च्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये रस्त्याच्या नावानिशी नोंद नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात रस्त्यांचा विकास करणे, याअंतर्गत ५० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्या निधीतून सात कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
"२०१२ मध्ये रस्ता तयार करण्यात आला होता. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्ता लाल पूररेषेत येत असला, तरी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शहरातील इतर रस्त्यांचीदेखील कामे सुरू आहेत." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.