नाशिक : प्रारूप मतदार याद्यांवर (Draft Voter List) विक्रमी हरकती आल्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे (State election commission) मागितलेल्या मुदत वाढीला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आता ९ ऐवजी १६ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. (7 days extension for publication of voter list NMC election Nashik News)
२३ जूनला महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्यांवर हरकत नोंदवण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाढत्या हरकती लक्षात घेता ३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सहा विभागात तब्बल ३८४७ विक्रमी हरकती आल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक झाली. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी प्रत्येक हरकतींची दखल घेऊन तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कामात कुचराई झाल्यास कारवाईच्या इशारादेखील त्यांनी दिला आहे.
हरकतींची संख्या लक्षात घेता ९ जुलैपर्यंत तक्रारींचा निपटारा करता येणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे आयुक्त पवार यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार १६ जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना पत्रकानुसार आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिकेला पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.