dust road sakal
नाशिक

NMC News: धूळ खाली बसविण्यासाठी 7 लाखांचा बार! पेठ रोडवर पाणी फवारणीचे देयके

सकाळ वृत्तसेवा

NMC News : पेठ रोडवरील हॉटेल राऊ ते जकात नाक्यापर्यंतच्या चार किलोमीटरपर्यंत रस्त्यावर उडणारी धुळ खाली बसविण्यासाठी पुन्हा एकदा सात लाखांचा बार उडविण्याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे.

यापूर्वी सात लाख रुपयांचे पाणी मारून देयके काढण्यात आली होती. परंतु आता नागरिकांच्या मागणीचा आधार घेऊन पुन्हा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. (7 lakh bar to settle the dust Charges for water spraying on Peth Road nmc nashik)

नाशिक महापालिका हद्दीतील पंचवटी विभागातील पेठ रोड राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राऊ ते जकात नाक्यापर्यंत चार किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने रस्त्यावरील खडे महापालिकेकडून भरण्यात आले.

परंतु गुजरातकडून येणारी व जाणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने रहदारीमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडते. यासंदर्भात नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात तक्रार आहे. त्यामुळे टँकरने पाणी मारून धुळ खाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिवसभरातून जवळपास चार टँकरद्वारे रस्त्यावर पाणी मारले जात आहे. पाणी मारण्याचे सात लाख रुपयांचे देयके यापूर्वी काढण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा नागरिकांच्या मागणीचा आधार घेऊन सहा लाख ९० हजार रुपयांचे देयके अदा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महासभा व स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान, धुळीसंदर्भात नागरिकांची वर्षभरापूर्वी तक्रार होती. त्यानंतर मात्र रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांच्या तक्रारीचा सुर कमी झाला.

मध्यंतरीच्या काळात पावसामुळे धुळ उडण्याचादेखील संबंध नसताना बांधकाम विभागाने पुन्हा एकदा पाणी फवारणीचे देयके काढण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव वादात सापडणार आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार पाणी फवारणीचे काम झाले असून त्यानुसार देयके देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

SCROLL FOR NEXT