मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारातील शहा प्लॉट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, धारदार तलवार, कोयता, सुरा, लोखंडी चाकू असा सुमारे ७८ हजार १०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. तिघे संशयित फरार झाले. सदब कॉम्प्लेक्सजवळ मंगळवारी (ता.१३) मध्यरात्री दोनच्या सुमारास पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. (7 people arrested with weapons preparing for robbery at Malegaon Nashik Crime News)
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना काही सराईत गुन्हेगार मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पाटील, हवालदार सचिन धारणकर, सुनील भामरे, पोलिस नाईक संतोष सांगळे, भरत गांगुर्डे, उमेश खैरनार, चालक अनिल रंगारी यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकला असता झाडाच्या आडोशाला काही इसम संशयास्पद स्थितीत लपलेले दिसले.
पथकाने त्यांच्या दिशेने पळत जावुन जाहिद अहमद मोहम्मद फारुख उर्फ बंटा (वय ३२), नवाज नबाब शेख (वय २७, दोघे रा.अख्तराबाद), मोहम्मद राशीद मोहम्मद याकुब (वय २८), फिरोज कलीम अहमद (वय ३८, दोघे रा. हिरापुरा), अमीर नुर मोहम्मद (वय ३०, रा. गुलाब पार्क), अनिल यशवंत शिंदे (वय ३३, रा.सायने बुद्रुक), सुरेश यशवंत शिंदे (वय ३६, मोसम पुल, मंडाळे बाग) या सात जणांना अटक केली. रब्बानी, मुशीर व नकसप काल्या हे तिघे फरार झाले.
अटक केलेल्या संशयितांची झडती घेतली असता देशी (गावठी) कट्टा, ३ जिवंत काडतूस, धारदार तलवार, कोयता, लोखंडी सुरी, लोखंडी चाकु असे ७८ हजार १०० रुपये किंमतीचे शस्त्रास्त्र मिळून आले. दहा जणांविरुध्द पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.